घरमहाराष्ट्रनगर-पुणे जिल्ह्याच्या पाण्यासाठी विखे पाटलांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना इशारा, म्हणाले...

नगर-पुणे जिल्ह्याच्या पाण्यासाठी विखे पाटलांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना इशारा, म्हणाले…

Subscribe

अहमदनगर – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिपद मिळाल्यानंतर पुन्हा नगर- पुणे जिल्ह्यांच्या पाणी प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला आहे. अहमदनगरच्या लोकांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. यासाठी पुन्हा तीव्र संघर्ष करू, असा इशारा विखे पाटील यांनी दिला आहे. यावेळी नव्या सरकारमध्ये जलसंपदा खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याची आठवण त्यांनी करून दिली. पाणी प्रश्नांसाठी अहमदनगरमध्ये विवृत्त सनदी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी सुरू केलेल्या भोर फौंडेशनच्या कार्यालयाचे उदघाटन विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

नगर आणि पुणे जिल्ह्यात कुकडीच्या प्रकल्पातील पाण्यावर वाद सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्ह्यातील नेत्यांनी पाणी आडविले असून नगरमधील राष्ट्रवादीचे नेते वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी या विषयावर बोलत नाहीत, असा आरोप विखे पाटील यांनी अनेकदा केला आहे. दरम्यान शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा या विषयाला हात घातला आहे.

- Advertisement -

कुकडी लाभक्षेत्रातील तालुक्‍यांना वर्षानुवर्षे पाण्‍यासाठी पुणे जिल्‍ह्यातील नेत्‍यांनी झुलवत ठेवले. या भागाला पाणी द्यायचेच नाही, असेच प्रयत्‍न सातत्‍याने झाले. परंतू आता आपल्‍याला हक्‍काच्‍या पाण्‍याचा संघर्ष तीव्र करावा लागणार आहे. कुकडीच्‍या सुधारित प्रकल्‍प आराखड्याचे काम सुरु करुन शेतकऱ्यांना न्‍याय मिळवून देण्‍याची भूमिका राज्‍य सरकार निश्चित घेईल. नगर जिल्‍ह्याच्‍या पाणी प्रश्‍नासाठी बाळासाहेब विखे पाटील, गणपतराव देशमुख यांनी संघर्ष केला. परंतू शेजारील पुणे जिल्‍ह्याने आपल्‍या जिल्‍ह्यावर नेहमीच पाण्‍याच्‍या बाबतीत अन्‍याय केला. कुकडी प्रकल्‍पात येत असलेल्‍या धरणांमधून शेतक-यांना हक्काचे पाणी मिळू शकलेले नाही. कुकडीच्‍या पाण्‍याचा लाभ मिळावा म्‍हणून डिंभे, माणीकडोह धरणाचे कामही होणे गरजेचे आहे. या कामासाठी देवेंद्र फडणवीस मुख्‍यमंत्री असताना त्‍यांनी ३ हजार ९०० कोटी रुपयांच्‍या कुक‍डी सुधारित प्रकल्‍प विकास आराखड्यास मान्‍यता दिली होती. निविदा काढण्‍याच्‍या सूचनाही दिल्‍या होत्‍या. मात्र, मागील आघाडी सरकारकच्‍या काळात जाणीवपूर्वक रखडवल्याचा आरोपही विखे पाटलांनी केला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -