घरमहाराष्ट्रनाशिकइगतपुरी-घोटी परिसरात होणार हर्बल फार्मा हब : नितीन गवळी

इगतपुरी-घोटी परिसरात होणार हर्बल फार्मा हब : नितीन गवळी

Subscribe

औद्योगिक वसाहतींमध्ये दोन हजार एकर जागा उपलब्ध करुन देणार

नाशिक : नाशिकच्या उद्योग विस्तारासाठी येत्या वर्षभरात शहरालगतच्या औद्योगिक वसाहतींमध्ये दोन हजार एकर जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यात इगतपुरी-घोटी परिसरातील सुमारे 700 एकरमध्ये हर्बल फार्मा हब उभारण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती एमआयडीसीचे विभागीय अधिकारी नितीन गवळी यांनी ‘मी नाशिककर’ सोबतच्या बैठकीत दिली दिली. पाथवे टू मॅग्नेटिक महाराष्ट्र ३.० मधील नाशिकच्या सहभागासाठी यामुळे मोठा हातभार लागणार आहे.

‘मी नाशिककर’ या बिगर राजकीय चळवळीची मुहूर्तमेढ 2018 मध्ये पियुष सोमाणी, उमेश वानखेडे, संजय कोठेकर, किरण चव्हाण व मनीष रावल या विविध क्षेत्रात कार्यरत नाशिककरांनी रोवली. एबीबी लिमिटेडच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत एबीपीचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश कोठावदे, राष्ट्रीय एम. एस. एम. ई. बोर्डाचे सदस्य प्रदीप पेशकार, सीआयआय उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष एम. डी .देशमुख, निपम नाशिकचे अध्यक्ष प्रकाश बारी, एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे डॉ. उदय खरोटे, सिन्नर तालुका औद्योगिक संस्थेचे आवारे रामकर्णा, महाराष्ट्र चेंबरचे सुधाकर देशमुख, स्टाईसचे अरुण चव्हाणके, अ‍ॅड. अशोक सोनावणे, आयमाचे मनीष रावल, लघु उद्योग भारतीचे संजय महाजन व ‘मी नाशिककर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोठेकर, निखिल पांचाळ, धनंजय बेळे, डॉ.उदय खरोटे, मंगेश पाटणकर हे उपस्थित होते.

- Advertisement -

बैठकीतील प्रमुख मुद्दे

  • नाशिकमध्ये माळेगाव, मापारवाडी, राजुरबहुला, घोटी, आजन (मालेगाव) येथे मिळून जवळपास 2 हजार एकर जागेसाठी प्रक्रिया सुरू
  • 1970 ते 2020 कालावधीत एमआयडीसी नाशिकतर्फे जवळपास 4500 एकर जागेचे वाटप.
  • तसेच गेल्या दीड वर्षात 750 एकर जागेचे वाटप होऊन 6 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक व त्यातून जवळपास 20 हजार रोजगार निर्मिती.
  • रिलायन्स, इंडियन ऑईल, जर्मनीचे डॉलर ग्रुप, वैंत ग्रुपची नाशिकमध्ये गुंतवणूक
  • प्रस्तावित राजुरबहुला येथील जागेमध्ये एसटीपीआयसाठी 50 एकर जागा आयटी पार्कसाठी राखीव ठेवण्याचा विचार
  • मोठ्या उद्योगांसाठी प्रयत्न करताना नाशिकच्या पर्यावरणास हानी पोचणार नाही यावर एकमत
  • सौरऊर्जा उत्पादन करून त्यातून कमी दराने लहान उद्योगांना वीज पुरवावी त्यासाठी अशा सौरऊर्जा प्रकल्पास एमआयडीसीमध्ये जागा देण्याची विनंती
  • इलेक्ट्रिकल उद्योगांसाठी आवश्यक टेस्टिंग लॅबची सुविधा लवकरच एबीबी उभारणार
  • या सर्व प्रकल्पांचा ‘मी नाशिककर’ सातत्याने पाठपुरावा करणार; अडचणी सोडवण्यास पुढाकार घेणार
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -