घरमहाराष्ट्र११ गावातील नागरिकांचा पुणे महापालिकेवर धडकणार मोर्चा

११ गावातील नागरिकांचा पुणे महापालिकेवर धडकणार मोर्चा

Subscribe

पुणे महापालिकेमध्ये ११ गावं समाविष्ट करण्यात आली. मात्र या गावांमध्ये विकासकामची बोंब आहे. पालिका प्रशासनाने ११ गावाकडून विविध करापोटी करोडो रुपये जमा करून घेतले. मात्र विकासकाम केली न गेल्यामुळे या गावातील नागरिक संतप्त झाले आहे.

पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावातील त्रस्त नागरिक मोर्चा काढणार आहे. उद्या पुणे महापालिकेवर हा धडक मोर्चा धडकणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. पुणे महापालिकेमध्ये ११ गावं समाविष्ट करण्यात आली. मात्र या गावांमध्ये विकासकामची बोंब आहे. पालिका प्रशासनाने ११ गावाकडून विविध करापोटी करोडो रुपये जमा करून घेतले. मात्र विकासकाम केली न गेल्यामुळे या गावातील नागरिक संतप्त झाले आहे. त्यामुळे उद्या ते मोर्चा काढणार आहे.

मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष

लोहगांव आणि परिसरातील पाणी, कचरा, वीज, स्ट्रीट लाईट, आरोग्य, ड्रेनेज इत्यादी प्रश्नाबाबत वेळोवेळी पालिकेच्या क्षेत्रीय अधिकारी यांना तोंडी व लेखी निवेदन दिले. यासाठी बैठक घेण्यात आल्या पण त्याचा काडीमात्र ही परीणाम झाला नाही. त्यामुळे लोहगावातील नागरिकांना १० दिवसात एकदा पाणी मिळत आहे. लोहगांवमधून एका वर्षात तब्बल साडेनऊ कोटी रूपये जमा करून घेतले. पण विकास कामावर अजिबात पैसा खर्च झाला नाही. मग ही गावे समाविष्ट कशासाठी करून घेतली फक्त पैसे वसुलीसाठी का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

- Advertisement -

बालगंधर्व चौकापासून निघणार मोर्चा

मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि ११ गावातील विकास कामे करण्यासाठी पालिकेच्या बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी. या मागणीसाठी या ११ गावातील ग्रामस्त पालिकेवर मोर्चा काढणार आहेत. बालगंधर्व चौकापासून हा मोर्चा निघणार असून थेट महापालिकेवर धडकणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -