घरमहाराष्ट्रसिगारेटचं व्यसन सोडायचंय ? मग करा फ्री कॉल

सिगारेटचं व्यसन सोडायचंय ? मग करा फ्री कॉल

Subscribe

तुमचे सिगारेटचे व्यसन सोडायचे असल्यास या टोल फ्रि नंबर जरुर संपर्क साधा.

तंबाखूजन्य पदार्थांचं व्यसन जडलं की ते सुटता सुटत नाही, असा अनुभव व्यसन करणाऱ्या प्रत्येकाला येतो. शिवाय, असे ही बरेच जण असतात ज्यांना हे व्यसन सोडायचं असतं. पण, योग्य मार्गदर्शन मिळत नाही. गॅट्स म्हणजेच ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हेनुसार, जवळपास ६२ टक्के धूम्रपान करणाऱ्या लोकांना सिगारेटचं व्यसन सोडण्याची इच्छा असते. पण, कोणाशी संपर्क करायचा, किंवा योग्य माहिती कुठे मिळेल या मार्गदर्शनाअभावी त्यांना ते करता येत नाही. पण, आता तसं होणार नाही. कारण, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सिगारेटच्या पॅकेटवर टोल फ्रि नंबर देण्यात आला आहे. या नंबरवर संपर्क केल्यास व्यसनी मंडळींना योग्य मार्गदर्शन मिळणार आहे.

या नंबरवर करा संपर्क

१ सप्टेंबर २०१९ पासून हा टोल फ्रि नंबर सुरू करण्यात आला आहे. ‘ क्विट टूडे ‘ अशी ही संकल्पना असून १८००-११-२३५६ हा टोल फ्रि नंबर देण्यात आला आहे. या नंबरवर संपर्क केल्यास व्यसनी मंडळींना तुम्हाला व्यसन सोडण्याबाबतची अधिक माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे.

- Advertisement -

२७ करोड लोक करतात तंबाखूजन्य पदार्थांचं वापर 

जगभरात जवळपास २७ करोड लोक तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात. त्यात तंबाखू आणि सिगारेटचं व्यसन करणाऱ्यांचं प्रमाण सर्वात जास्त आहे. शिवाय त्यातून मृत्यू होण्याचं प्रमाण ही जास्त आहे. तंबाखूनज्य पदार्थांमुळे सर्वात जास्त कॅन्सर होतो, असं कर्करोगतज्ज्ञ सांगतात. त्यामुळे हा टोल फ्रि नंबर खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतो असं मत संबंध हेल्थ फाउंडेशनचे ट्रस्टी संजय सेठ यांनी ‘माय महानगर ‘ कडे व्यक्त केलं आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ३ एप्रिल २൦१८ ला जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, प्रत्येक सिगारेटच्या पॅकेटवरील ८५ टक्के जागा सावधगिरी बाळगणाऱ्या जाहिरातीला द्या, ज्यात कर्करोगग्रस्ताचे चित्र, संदेश आणि हेल्पलाईन नंबर असेल असे आदेश दिले होते. त्यानुसार हेल्पलाईन नंबरचा निर्णय १ सप्टेंबर २൦१८ पासून लागू करण्यात आला आहे. ज्यात चित्रासोबत संदेश आणि हेल्पलाईन नंबरचा समावेश आहे. त्यामुळे सिगारेटच्या विरोधात लढा देणाऱ्या डॉक्टरांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

- Advertisement -

तंबाखूजन्य पदार्थ सोडण्याचं प्रमाण हे राज्यात ३ टक्के एवढं आहे. शिवाय, ६० टक्के लोकांची इच्छा तंबाखूचं व्यसन सोडण्याची आहे. पण, क्लिनिक्स, दवाखाने जवळ नसल्याकारणाने कुठे जावं असे प्रश्न अनेकांना पडतात. यातून टाळाटाळ केली जाते. पण, आता या टोल फ्रि नंबरमुळे फोनवरुन माहिती मिळू शकेल. एका व्यक्तीला जवळपास ६ महिने ते १ वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळे त्यांना तशी ट्रिटमेंट आणि सल्ले दिले जाणार आहेत.

– संजय सेठ, ट्रस्टी, संबंध हेल्थ फाउंडेशन

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतलेला हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. यामुळे सिगारेट आणि तंबाखूचं व्यसन असणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण होईल. यामुळे त्यांची व्यसनमुक्तीकडे वाटचाल सुरू होईल. तंबाखू सोडण्यासाठी सरकारने एक हेल्पलाइन बनवलीये. हे सिगारेटमुक्त भारताच्या दृष्टीने एक मोठं पाउल आहे. या हेल्पलाइनवर नागरिकांना मोफत सिगारेट सोडण्यासंबंधी माहिती मिळेल.

– डॉ. पंकज चतुर्वेदी, कर्करोग सर्जन आणि प्राध्यापक , टाटा मेमोरियल हॉस्पिटल

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -