घरमहाराष्ट्रआम्हाला दंगल घडवायची नाही; राज ठाकरे यांचा भोंग्यांवरून राज्य सरकारला पुन्हा इशारा

आम्हाला दंगल घडवायची नाही; राज ठाकरे यांचा भोंग्यांवरून राज्य सरकारला पुन्हा इशारा

Subscribe

तसेच रमजान झाल्यावर 3 मे नंतरही मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत, तर मनसेकडून सर्व बाजूने तयारी करण्यात आल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. मशिदींवरील भोंगे हा धार्मिक नव्हे, तर सामाजिक विषय आहे. न्यायालयाने याबाबत स्पष्ट आदेश दिलेले आहेत.

मुंबई : मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्यावरून महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट रचला जात आहे, असा गंभीर आरोप सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केला जात आहे. त्यावर आम्हाला राज्यात दंगल घडवायची नाही. मात्र, आमच्या मिरवणुकांवर दगडफेक झाल्यास आमचेही हात काही बांधलेले नाहीत, समोर जे कोणते हत्यार असेल ते आमच्याही हातात द्यायला लावू नका, जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे, असा इशारा दिल्लीतील हिंसाचारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिला.

तसेच रमजान झाल्यावर 3 मे नंतरही मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत, तर मनसेकडून सर्व बाजूने तयारी करण्यात आल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. मशिदींवरील भोंगे हा धार्मिक नव्हे, तर सामाजिक विषय आहे. न्यायालयाने याबाबत स्पष्ट आदेश दिलेले आहेत. देशापेक्षा कुठलाही धर्म मोठा नाही. मुस्लीम समाजालाही या गोष्टी समाजायला हव्यात. भोंग्यांचा लोकांना त्रास होतो. याची कल्पना त्यांना असायला हवी. नाहीतर आमच्याही लाऊड स्पीकरवरील हनुमान चालिसा त्यांना ऐकावीच लागेल. आमच्या लोकांवर कारवाई करण्याऐवजी राज्य सरकारने बेकायदा भोंग्यांवर कारवाई करावी, असेही राज ठाकरे राज्य सरकारला पुन्हा एकदा बजावले.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत मशिदींवरील भोंग्यांबाबतची भूमिका पुन्हा स्पष्ट केली. भोंग्यांचा मुद्दा हा धार्मिक नव्हे तर सामाजिक आहे. रमजाननंतर राज्यासह देशभरातील मशिदींनी भोंगे बंद करावेत, या आपल्या अल्टिमेटमवर आपण ठाम असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. तुम्ही जर दिवसातून पाचवेळा भोंगे लावणार असाल, तर आम्ही दिवसातून पाचवेळा मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू. यासाठी देशभरातील सर्व देशभक्त हिंदू बांधवांनी तयारीत राहावे, असा इशाराही त्यांनी दिला. सर्वोच्च न्यायालयानेदेखील भोंग्यांबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे मुस्लीम नागरिकांनी त्याचे पालन करावे. आत्ता रमजान सुरू आहे. त्यामुळे मला कोणतीही गोष्ट करायची नाही, पण त्यांना ३ मे पर्यंत काही समजले नाही, त्यांना या देशातील कायद्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयापेक्षा स्वतःचा धर्म मोठा वाटत असेल, लाऊड स्पीकर वाटत असेल, तर मला वाटते जशास तसे उत्तर देणे देखील गरजेचे आहे, असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले.

मनसे पक्ष म्हणून आमची सर्व बाजूंनी तयारी सुरू आहे. या महाराष्ट्रात आम्हाला कोणत्याही प्रकारच्या दंगली नको आहेत. कोणत्याही प्रकारच्या हाणामार्‍या नको आहेत. या देशातील महाराष्ट्रातील शांतता आम्हाला भंग करायची नाही, तशी इच्छा देखील नाही. माणुसकी म्हणून मुस्लीम धर्मीयांनी या गोष्टींचा विचार करायला हवा. त्यांच्या प्रार्थनेला कोणीही विरोध केलेला नाही. सगळ्या मशिदींवरचे लाऊड स्पीकर अनधिकृत आहेत तर आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोष्टी तुम्ही अनाधिकृत कशा मानता. मशिदीवरील भोंगे शांतता भंग करत असतील तर त्यांना परवानगी देऊ नका असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. आमच्याकडून मिरवणूक निघत असताना त्यावर दगडफेक होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, आमचे हात काही बांधलेले नाहीत. दगड आम्हालाही हातात घेता येतो. समोर जे कोणते हत्यार असेल ते आमच्याही हातात द्यायला लावू नका, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिल्लीतील हिंसाचारावरून दिली आहे.

- Advertisement -

1 मे रोजी औरंगाबाद, 5 जूनला अयोद्धेचा दौरा

महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी औरंगाबादेतील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानामध्ये जाहीर सभा घेणार आहोत, अशी माहिती राज ठाकरेंनी यावेळी दिली. तसेच आपण आपल्या सर्व सहकार्‍यांसह 5 जून रोजी अयोद्धेला जाऊन प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घेणार आहोत, असेही राज यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंची जागा राज घेणार

बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्त्वाचा वारसा खर्‍या अर्थाने राज ठाकरे चालवत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जागा लवकरच राज ठाकरे घेतील, असा दावा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -