घरमहाराष्ट्रफक्त महाराष्ट्राचा नव्हे, तर आम्ही देशाचा विचार करतो - उद्धव ठाकरे

फक्त महाराष्ट्राचा नव्हे, तर आम्ही देशाचा विचार करतो – उद्धव ठाकरे

Subscribe

महाराष्ट्र पुढे जाणारं राज्य आहे. जे जे आवश्यक आहे ते आम्ही करत आहोत. आम्ही राज्याच्या नव्हे तर देशाचा विचार करतो आहोत. महाराष्ट्र नेहमीच दिशा दाखवणारं राज्य राहिलं आहे, याचा मला अभिमान आहे. महाराष्ट्रात ज्याची सुरुवात होते, तो पूर्ण देश स्वीकारतो, असंही उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलंय.

मुंबईः महाराष्ट्र पुढे जाणारं राज्य आहे. जे जे आवश्यक आहे ते आम्ही करत आहोत. आम्ही राज्याच्या नव्हे तर देशाचा विचार करतो आहोत. महाराष्ट्र नेहमीच दिशा दाखवणारं राज्य राहिलं आहे, याचा मला अभिमान आहे. महाराष्ट्रात ज्याची सुरुवात होते, तो पूर्ण देश स्वीकारतो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. पुणे येथे आयोजित पर्यायी इंधन परिषद परिसंवादाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते.

उद्योजकांना महाराष्ट्रात यावंसं वाटलं पाहिजे. गाडी चालवताना स्पीड ब्रेकर समजू शकतो, पण गुंतवणूक करताना स्पीड ब्रेकर आले तर थोडं अवघड होतं. म्हणून गुंतवणूकदारांच्या मार्गातील स्पीड ब्रेकर काढणं आणि त्यांचा ड्राईव्ह जो आहे तो स्मूथ व्हावा यासाठी पावलं उचललेली आहेत. महाराष्ट्र पुढे जाणारं राज्य आहे. जे जे आवश्यक आहे ते आम्ही करत आहोत. आम्ही राज्याच्या नव्हे तर देशाचा विचार करतो आहोत. महाराष्ट्र नेहमीच दिशा दाखवणारं राज्य राहिलं आहे, याचा मला अभिमान आहे. महाराष्ट्रात ज्याची सुरुवात होते, तो पूर्ण देश स्वीकारतो, असंही उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलंय.

- Advertisement -

दोन वर्षांच्या पॉझ बोर्डातून प्लेन बोर्डावर आलो आहोत. आता आपण थोडीशी बंधनं हटवलेली आहेत. अजूनही कोरोनाचा धोका गेलेला नाही. कोरोना जसा व्हायरस आहे, तसा प्रदूषण हा एक व्हायरस आहे. त्या प्रदूषणामुळेच आपल्याला लंग्स आणि फुफ्फुसांचे आजार भोगावे लागतायत. पर्यावरणही आपण जपलं पाहिजे. शाश्वत विकास आणि विकासामध्येही फरक आहे. शाश्वत विकास म्हणजे पर्यावरणाची हानी होऊ न देता आणि नाईलाजानं होणार असल्यास कमीत कमी पर्यावरणाला धोका पोहोचेल जो दीर्घकाळ टिकेल असा विकास करणे. पर्यावरणाचा विचार केला नाही तर आपल्याला फटका पडतोच. निसर्गावरती आक्रमण आणि अतिक्रमण एका मर्यादेच्या बाहेर करायला लागलो आणि तो जर कोपला तर आपण त्याच्या कोपाच्या पुढे धावू शकणार नाही, असंही त्यांनी सांगितलंय.

मार्गदर्शन करणं हा राजकारण्यांचा छंद आहे. आगगाड्या आल्या, कामगार कोळसा टाकत राहायचे. लहानपणी गाणं होतं, धुरांच्या रेषा लांबून पाहताना बरं वाटायचं. आज आपलं लक्ष गेल्यानं धूर टाकणाऱ्या गाड्या बंद झाल्या. महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीनं चांगली कामं गेल्या काही दिवसांत सुरू झालीत. आरोग्यदायी जीवन कसं प्राप्त करू शकता, याबाबत विचार करतोय. नागपूर, मुंबई आणि मराठवाड्यात परिषदेचे आयोजन करणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -