घरताज्या घडामोडीसंजय राऊतांसारखा राष्ट्रवादीचा भोंगा असाच वाजत राहणार, नितेश राणेंची खोचक टीका

संजय राऊतांसारखा राष्ट्रवादीचा भोंगा असाच वाजत राहणार, नितेश राणेंची खोचक टीका

Subscribe

महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यावरुन राजकारण तापलं आहे. मशिदीवरील भोंगा काढण्यासाठी भाजप आक्रमक भूमिका घेत आहे. यानंतर मनसेकडूनही भोंग्यांविरोधात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना राष्ट्रवादीचा भोंगा म्हणत भाजप आमदार नितेश राणेंनी टीकास्त्र डागलं आहे. संजय राऊत हे राष्ट्रवादीचा भोंगा असून हा असाच वाजत राहणार असल्याचे नितेश राणे यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेना आता राष्ट्रवादी काँग्रेसची बी टीम झाली असून संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे असे नितेश राणे म्हणाले आहेत. महाविकास आघाडी सरकार भाजपच्या नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप यावेळी नितेश राणेंनी केला आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊतांवर घणाघाती हल्ला केला आहे. नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत सारख्या राष्ट्रवादीच्या भोंग्याला किती महत्त्व दिले पाहिजे हे आपल्याला कळाले पाहिजे. सुरुवातीला २०१४ मध्ये राऊतांना ईडीच्या सर्व कारवाया योग्य वाटत होत्या आज जेव्हा त्यांच्यावर कारवाई होते ते भ्रष्टाचार करण्यामागे पूर्ण गुंतले आहेत. आता प्रवीण राऊतांविरोधात चार्जशीट तयार झाली आहे. त्यामुळे हा भोंगा असाच वाजत राहणार, या भोंग्याचा आवाज ऐकायचा का हे आपण ठरवायचे असा हल्लाबोल नितेश राणेंनी संजय राऊतांवर केला आहे.

- Advertisement -

राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत

भाजप हा एकमेव हिंदूत्व मोठं करणारा पक्ष आहे आणि हे वारंवार सिद्ध झाले आहे. मोदींच्या नेतृत्वात देशात हिंदुत्वाची लाट आहे आणि हिंदुराष्ट्र म्हणून आपला देश पुढे जात आहे. यामुळे भाजपच्या विचारसरणीला पकडून जे हिंदुत्वाचा धागा धरत असतील त्यांचे आम्ही स्वागत करु, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका ही हिंदूत्वाची धरून असेल आणि ती भाजपच्या धाग्याला धरुन असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेला सोबत घेऊन बाळासाहेबांचे विचार संपवण्याचे काम असतील, शिवसेनेची मूळ ओळख पुसण्याचे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी करत आहे.

शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची बी टीम

शिवसेनेने दुसऱ्या कोणाला बी टीम बोलण याची शिवसेनेला लाज वाटली पाहिजे. खरं म्हणजे राष्ट्रवादीची शिवसेना आता बी टीम झाली आहे. ही ओळख महाराष्ट्रात तयार झाली आहे. हिंदुत्वाची ओळख म्हणून पुढे कोण जात असेल तर भाजपकडून स्वागत आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडलं त्यांना आता लाज वाटत असेल तर त्यांची वळवळ होणारच, म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये जी काही परिस्थिती राज ठाकरेंनी भाषणात सांगितली ती आतापर्यंत भाजपचे प्रत्येक नेते सांगत आले आहेत. भोंग्याचा विषय प्रसाद लाड, मोहित कंबोज यांनी लावून धरला आहे. मुंबईतील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल जर कोणी मंडळी लढत असेल तर ती चांगली बाब आहे. वाईट काय? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : शरद पवारांशिवाय मोदींना पर्याय आणि विरोधकांची एकजूट शक्य नाही, संजय राऊतांचे वक्तव्य

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -