घरमहाराष्ट्रMaratha Reservation: आंदोलन मागे न घेता मूक आंदोलन सुरूच राहणार- संभाजीराजे

Maratha Reservation: आंदोलन मागे न घेता मूक आंदोलन सुरूच राहणार- संभाजीराजे

Subscribe

मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाला सुरुवात केलेली असताना राज्य सरकारने याची दखल घेऊन खासदार संभाजीराजे बोसले यांच्याशी गुरूवारी सविस्तर चर्चा केली. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण आदींच्या उपस्थितीत संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांशी त्यांच्या प्रमुख मागण्यांबाबत चर्चा केली. मराठा समाजाच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, तसेच सरकारने सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मराठा मूक आंदोलनाचे नेते खासदार संभाजीराजे यांनी आपली मतं स्पष्ट केली. राज्य शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या असल्या तरी देखील सरकारशी अजूनही चर्चा सुरूच आहे. त्यामुळे अद्याप आम्ही मूक आंदोलन मागे घेतलेले नसून मूक आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

समन्वयकांशी चर्चा करुन पुढील दिशा ठरवणार

नाशिकला सर्व समन्वयकांशी चर्चा करुन पुढील दिशा ठरवली जाणार आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. यासह ते असेही म्हणाले की, कोल्हापूरमध्ये सुरु झालेलं मूक आंदोलन सुरुच राहणार आहे. हे आंदोलन ३६ जिल्ह्यांमध्ये घेऊन जाण्याचा आमचा निर्धार आहे. राज्य सरकारशी झालेल्या चर्चेत त्यांनी आंदोलन थांबवण्याबाबत विनंती केली. मात्र, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. सरकारशी चर्चा सुरु आहे. दरम्यान नाशिकला येत्या २१ जूनला सकल मराठा समाजाच्यावतीनं मूक आंदोलन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

समन्वय समितीची स्थापना करणार

मराठा समाजाने राज्य सरकारकडे केलेल्या मागण्या आणि त्यावर राज्य सरकारने दिलेले आश्वासनाचा पाठपुरावा घेण्यासाठी एका समन्वय समितीची स्थापना करण्यास राज्य सरकारने सांगितले आहे. त्यानुसार एका समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे संभाजीराजे भोसले यांनी सांगितले.

रिव्ह्यू पिटीशन राज्य सरकार गुरुवारी दाखल करणार

मराठा आरक्षणाच्या निकालालबाबत सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर आपण पुढे कसे जायला हवं, यासंदर्भात चर्चा झाली. त्या पार्श्वभूमीवर रिव्ह्यू पिटीशन राज्य सरकार गुरुवारी दाखल करणार आहे. त्यासोबतच राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींकरवी केंद्र मागास आयोगाकडे यासंदर्भातला प्रस्ताव सादर करण्याचा देखील पर्याय असून त्यासाठी प्रयत्न करण्याला राज्य सरकारने तत्वत: मान्यता दिली असल्याची माहिती यावेळी संभाजीराजे यांनी दिली.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -