घरमहाराष्ट्रWeather Update : कोकणात उष्णतेच्या लाटेची शक्यता; मुंबई, ठाण्याचाही पारा चढणार

Weather Update : कोकणात उष्णतेच्या लाटेची शक्यता; मुंबई, ठाण्याचाही पारा चढणार

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढलेला आहे. ज्यामुळे आता पुन्हा मुंबई, ठाणे आणि कोकणाचा पारा वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढलेला आहे. विदर्भ, मराठवाडा येथील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसलेल्या असल्या तरी मुंबई, ठाणे, कोकण या भागात वाढत्या तापमानाच्या झळा बसत आहेत. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस मुंबई आणि ठाण्यासह, कोकणात उष्णतेची लाट येऊ शकते. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना योग्य काळजी घ्यावी, असे आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. (Weather Update in Maharashtra Mumbai, Thane, Konkan heat wave)

आजपासून (ता. 27 एप्रिल) पुढील तीन दिवसांमध्ये मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना वाढत्या तापमानाची झळ बसू शकते. उत्तर कोकणामध्ये 28 आणि 29 एप्रिलला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या दोन दिवसांमध्ये तापमानाचा पारा 40 ते 42 अंशावर जाण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेली आहे. याआधी 15 आणि 16 एप्रिल या दोन दिवसांमध्ये मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये तापमान वाढ नोंदविण्यात आली होती. 15 आणि 16 एप्रिल रोजी नवी मुंबईचा पारा 41 अंश आणि पनवेलचा पारा 43 अंशावर गेला होता.

- Advertisement -

हेही वाचा… Bhayander News: १० टक्के पाणीपुरवठा लाभ कर आकारण्यास विरोध

मुंबई, ठाणे, कोकण या भागांत तापमानाचा पारा वाढणार असला तरी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान होत आहे.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी नांदेड, परभणी, जालना, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने तडाखा दिला. राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण असल्याने कमाल तापमानाचा पारा सरासरीपर्यंत कमी झाल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदण्यात आले. पण अद्यापही राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाता अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -