घरमहाराष्ट्रनाशिकतुम्ही तुमच्या मुलाला शाळेत का टाकता?; वाचा सविस्तर

तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत का टाकता?; वाचा सविस्तर

Subscribe

तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे? मुलं जन्माला आली की त्यांना शाळेत पाठवावंच लागतं. नाहीतर त्याला नोकरी कशी लागेल? तो पैसे कसे कमवेल? मुळातच आपण मुलांना शाळेत का टाकतो याचं समाधानकारक उत्तर बहुतांश पालकांकडे नसतं. माणसाचा विकास, व्यक्ती व्यक्तीची प्रगती, जगण्याचा आनंद याचं खरं मूळ असतं त्याला देण्यात येणार्‍या शिक्षणात. मग तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की, आपण शाळेत होतो तेव्हा टीचर कसा अभ्यास करून घ्यायचे? शाळा आपल्याला कसं शिक्षण देत होती? आठवतंय? ’घोका आणि ओका’ आपल्या काळातली शिक्षणपद्धती होती. आता आपली मुलं शाळेत जात आहेत आणि तीसुद्धा ’घोका आणि ओका’ या पद्धतीनेच शिकत आहेत. फक्त पाठांतराच्या पद्धतीत सुसंकृतपणा आला आहे. टाय, बूट घालून टच स्क्रीनवर पाठ केलेलं परीक्षेच्या दिवशी उतरवतो आणि परीक्षा झाल्या झाल्या विसरून जातो. त्यामुळे आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र परिवर्तनाची आवश्यकता आहे.

आपण आजच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीनुसार मुलांच्या शिक्षणाचा निर्णय घेतो. पालक त्यांच्या पाल्याला नर्सरीमध्ये प्रवेश घेताना त्याला/तिला डॉक्टर /इंजिनिअर करायचं ठरवूनच शाळेमध्ये प्रवेश घेतात. खरंतर विविध शैक्षणिक रिपोर्ट सांगतात सन 2040/50 मध्ये अधिक सर्जनशील, निर्माणक्षम अशी मनुष्यबळाची आवश्यता आहे. जर भारतातील विद्यार्थी आपल्याला सर्जनशील, प्रतिभावंत आणि निर्माणक्षम हवे असतील तर आज शाळा शाळांमध्ये जे शिक्षण आणि शिक्षण वातावरण आहे, शिक्षणाची जी रचना आहे, ती सर्व बदलली पाहिजे. अधिक प्रतिभावंत व्यक्ती बनण्यासाठी बालकाला लहानपणी विविध अनुभव मिळणं देखील आवश्यक असतं. लहान वयात विविध गोष्टी करून बघण्याची संधी मिळणं हा निर्णयक्षमतेचा मूलभूत पाया असतो.

- Advertisement -

या सगळ्याचा विचार करून ‘इस्पॅलिअर हेरिटेज स्कूल’ नाशिकमध्ये सुरू झाली. इस्पॅलिअर असं शिक्षण देतं की ज्यातून विद्यार्थ्यांना विविध अनुभव मिळतील. या शाळेने असं काही शैक्षणिक नियोजन केलं आहे की, ज्यामुळे सातत्याने विद्यार्थ्याला त्याच्या रस असलेल्या गोष्टी सादर करण्याची संधी मिळते. शाळेत असं काही वातावरण निर्माण केलं आहे की जिथे सर्व शिक्षक अनेक उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करीत असतात. शाळेची रचना अशी आहे की त्यातून विद्यार्थ्यांना सातत्याने नवनवीन संकल्पना, विचार सुचतात. निसर्ग, चित्र, कला, शिल्प, संगीत, विज्ञान, गणित, भाषा, साहित्य याची अशी काही सांगड शिक्षण अभ्यासक, सचिन उषा विलास जोशी यांनी घातली आहे. ज्यातून इस्पॅलिअर शाळेचं वातावरण निर्मितीक्षमतेसाठी पूरक बनलं आहे. इस्पॅलिअर हेरिटेज स्कूलचा अभ्यासक्रम असा आहे की, त्यातून प्रत्येक विद्यार्थी त्याच्या त्याच्या क्षेत्रात सर्वजनशील आणि निर्मितीक्षम बनेल. दहा एकरच्या हेरिटेज कॅम्पसमध्ये विद्यार्थी निसर्गात शिकतात. शाळेची रचना अशी आहे की आपल्याला रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘शांतिनिकेतन शाळे’ची आठवण होते.

‘गांधी-आईन्स्टाईन’ यांच्या तत्त्वावर सुरू झालेली ‘इस्पॅलिअर हेरिटेज स्कूल’ ही मुळात प्रयोगशील शाळा आहे. अनुभवातून शिक्षण ही संकल्पना आहे. जगण्याचं शिक्षण देणार्‍या या शाळेत सी.बी.एस.ई.चा अभ्यासक्रम असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर या शाळेचं लक्ष केंद्रित असतं. या शाळेतील विद्यार्थी गायीचं दूध काढण्यापासून ते शेती करण्यापर्यंत विविध अनुभव घेत असतात. दर आठवड्याला गणित आणि विज्ञानाचे विविध प्रयोग कृतीतून करत असतात. इतिहास हा नाटकातून तर भूगोल विषय प्रात्यक्षिकातून शिकत असतात. त्यालाच ‘ज्ञानरचनावादी शिक्षण’ म्हणतात.

- Advertisement -

आपण माहितीचा साठा करून ठेवण्याला शिक्षण म्हणतो. माहिती साठवणं म्हणजे शिक्षण असेल तर कम्प्युटर आणि विद्यार्थ्यांमध्ये काय फरक आहे? आज जगातल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं गूगल देत आहे. विद्यार्थ्यांनी योग्य प्रश्न विचारावा. लगेच उत्तर मिळतं. छत्रपती शिवाजी महाराज केव्हा जन्माला आले? या सर्व प्रश्नांची उत्तरं गुगल देईल. मग या एकविसाव्या शतकात टिचर्सची आवश्यकता काय? आज टीचर्सचा रोल शिवराय केव्हा जन्मले हे सांगणं नसून महाराजांचे गुण, डॉ.आंबेडकरांचे गुण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ते कसे रुजतील इकडे लक्ष देणं हा आहे. आता शिक्षणाचा उद्देश आयुष्यात येणार्‍या समस्यांची उत्तरं शोधता येणं आहे. त्यासाठी इस्पॅलिअर स्कूलमध्ये असे काही उपक्रम घेतात की ज्यामध्ये विद्यार्थी विविध समस्यांना तोंड देतील. त्यातून ते स्वत:ची उत्तरं शोधतील. त्यासाठी सी.बी.एस.ई. चा अभ्यासक्रम दैनंदिन जीवनाशी जोडला गेला आहे. या शाळेतील विद्यार्थी अनुभवातून शिकतात, वस्तू, कल्पना, विचार हाताळून शिकतात. या पद्धतीने शिक्षण मिळालं तरच मुलांना शाळेत टाकण्याचा उद्देश सफल होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -