घरमहाराष्ट्रनाशिकनाशकातील हुडहुडी कायम; पुढील तीन दिवस थंडीची लाट

नाशकातील हुडहुडी कायम; पुढील तीन दिवस थंडीची लाट

Subscribe

नाशिक : नाशिकसह जिल्ह्यातील थंडीचा पारा दिवसेंदिवस घसरत आहे. रविवारी पुन्हा नाशिकच्या तापमानात घट होऊन पारा घसरला आहे. तर नाशिक कॅलिफोर्नियात म्हणजेच निफाड तालुक्यात ६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शहरात रविवारी 8.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली तर निफाडमध्ये आज 6.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. पुढील तीन दिवस थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

नववर्षाच्या सुरवातीपासूनच नाशिक शहरासह जिल्ह्यात कमालीची थंडी असून दिवसभर हवेत गारवा असल्याने प्रचंड थंडी जाणवत आहे. त्यामुळे घराबाहेर निघणे कठीण होऊन बसले आहे. जवळपास आठवडाभरापासून पारा खाली जात असल्याने नाशिकसह जिल्ह्याला हुडहुडी भरली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून मागील काही दिवसांपासून हुडहुडीने वेढा घातला आहे. ढगाळ वातावरणाने काढता पाय घेतल्यानंतर आता थंडीचे आगमन झाले असून किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानातही घसरण झाली आहे. तर सकाळच्या सुमारास थंड वार्‍यांमुळे दिवसाही नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सकाळी नऊ वाजेपर्यंत घरातून बाहेर निघणे कठीण झाले आहे. नाशिकमध्ये शनिवारी 8.8 अंश तापमानाची नोंद करण्यात आली तर पारा घसरून 8.4 अंशावर पोहचला आहे. तर जिल्ह्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला सातत्याने निचांकी तापमानाची नोंद करण्यात येत आहे.

- Advertisement -

मागील आठवड्यात सलग दोन दिवस 5 अंशावर पारा ‘जैसे थे’ होता. दरम्यान थंडीची सुरुवात झाल्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात बोचर्‍या थंडीचा अनुभव नाशिककरांनी घेतला. मात्र जानेवारीचा पाहीला आठवडा सरल्यानंतर कमाल तापमानात मात्र घसरण पाहायला मिळत आहे. पहाटेपासून ते दिवसभर हवेत गारवा असल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. सकाळी आठ वाजेला निघणारे नोकरदार वर्गही नऊ वाजेला घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सकाळपासून घातलेला स्वेटर दिवसभरही परिधान करावा लागत आहे.

मागील आठवडाभर हुडहुडी कायम

मागील सोमवारी नाशिक शहर 8.7, मंगळवारी 7.6, बुधवारी 9.0, गुरुवारी 9.2, शुक्रवारी 13.0, शनिवारी 8.8, तर रविवारी हेच तापमान 8.4 अंशावर पोहचले आहे. तर दुसरीकडे निफाडचा पारा देखील घसरत असून मागील आठवड्यात सलग दोन दिवस 5 अंशावर पारा थांबला होता. तर आज निफाचं कुंदेवाडी गहू केंद्रात 6.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर नाशिक 8.4 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान हवेत गारवा असल्याने प्रचंड थंडी जाणवत असल्याचे चित्र आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -