घरमहाराष्ट्रएवढा बाऊ कशासाठी - सुधीर मुनगंटीवार

एवढा बाऊ कशासाठी – सुधीर मुनगंटीवार

Subscribe

"बेईमानाना आणि गद्दारांना हिंदुहृयसम्राट म्हण्याची नवीन पंरपर", अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत केली

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजस्थान विधासभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले होते. मुख्यमंत्री हे 23 नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये भाजपचे उमेदवार बालमुकुंदाचार्य महाराज यांच्या प्रचारासाठी होते. यावेळी महाराजांच्या कार्यकर्त्यांनी छापलेल्या पोस्टरमध्ये मुख्यमंत्र्यांचा ‘हिंदुहृदयसम्राट’ उल्लेखावर केला होता. यावर राज्यात ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला जात आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या रक्षणासाठी एवढे मोठे पाऊस उतलले. त्यामुळे कार्यक्रर्त्यांसाठी हिंदुत्वाचा आवाज म्हणजे शिंदे वाटणे साहाजिक आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांचा ‘हिंदुहृदयसम्राट’ उल्लेखावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “एकनाथ शिंदेंनी हातावर प्राण घेऊन बाळासाहेबांचे विचारांचे रक्षण घेण्यासाठी एवढे मोठे पाऊल उचलले. यामुळे कार्यकर्त्यांना हिंदुत्वाचा आवाज म्हणजे शिंदे वाटणे साहजिक आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी उत्साहात शिंदेंना ‘हिंदुहृदयसम्राट’ असे लिहले. त्यात एवढा बाऊ करून राजकारण करणे गैर आहे का?”, असा सवाल सुधीर मुनगंटीवारांनी पत्रकारांशी बोलताना केला.

- Advertisement -

हेही वाचा – “एकनाथ शिंदेंनी स्वत:ला हिंदुहृदयसम्राट…”; राजस्थानमधील ‘त्या’ बॅनरवरून शिंदे गटाचा खुलासा

नेमके काय आहे प्रकरण?

राजस्थान विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री गेले होते. यावेळी प्रचारासाठी लावलेल्या पोस्टरमध्ये मुख्यमंत्र्यांचा ‘हिंदुहृदयसम्राट’असा उल्लेख केला आहे. ठाकरे गटाने हे पोस्टर ट्वीट करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ठाकरे गटाने ट्वीट करत म्हटले, “पक्ष चोरला, नाव चोरलं, बाप चोरायचा प्रयत्न केला… आता हेही? किती तो निर्लज्जपणा? जगात ‘हिंदुहृदयसम्राट’ फक्त एकच…. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे! त्यांच्या आधी ना कोणी होता, त्यांच्यानंतर ना कोणी होऊ शकेल! जनता दूधखुळी नाहीये,
सगळ्याचा हिशोब होणार”, असे ट्वीट करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

- Advertisement -

हेही वाचा – “शिंदेंकडे भाजपाचा प्रचार…” ‘हिंदुहृदयसम्राट’च्या उल्लेखावरून ठाकरे गटाच्या आमदारांची टीका

‘हिंदुहृयसम्राट’वरून संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका

बेईमानाना आणि गद्दारांना हिंदुहृयसम्राट म्हण्याची नवीन पंरपर, अशी टीका संजय राऊतांनी केली. यांसदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, “आम्ही इतकी वर्ष बाळासाहेब ठाकरे सन्मानिय हिंदुहृयसम्राट यांच्याबरोबर काम केले. बाळासाहेबांचा हिंदुत्वासाठी त्यांचा संघर्ष पाहिला, बाळासाहेबांनी सत्तेसाठी कधी तडजोडी आणि बेईमानी केली नाही. आता बेईमानाना आणि गद्दारांना हिंदुहृयसम्राट म्हण्याची नवीन पंरपरा नव्या हिंदुत्वात सुरू झाली असेल, तर हे पहावे लागेल, आता एकनाथ शिंदे हे हिंदुहृयसम्राट असतील, तर त्यांनी हिंदुहृयसम्राट म्हणून काय महान काम केले आहे. हे आम्हा सर्वांना पहावे लागेल,”अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -