घरक्राइमगृहमंत्री, विरोधी पक्षनेत्यांच्या विदर्भात चालले तरी काय? महिला, मुलींच्या सुरक्षेचा 'बोभाटा'

गृहमंत्री, विरोधी पक्षनेत्यांच्या विदर्भात चालले तरी काय? महिला, मुलींच्या सुरक्षेचा ‘बोभाटा’

Subscribe

पश्चिम महाराष्ट्रातील आघाडीचे शहर म्हणजे अकोला. सत्तांतरानंतर याच अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री पद गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.

मुंबई : उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांना गुन्हेगारीचे राज्य म्हणून संबोधले जात होते. परंतू आता या राज्यांनंतर महाराष्ट्रातही गुन्हेगारी डोकं वर काढू पाहत आहे. दर दिवशी लहान सहान घटना घडत असतानाच विदर्भातून मात्र, विकृत गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहे. अकोला, भंडारा आणि आज शुक्रवारी (24 नोव्हेंबर) बुलढाण्यातील घटना म्हणजे या विकृतीचा कळसच. तेव्हा गृहमंत्री, विरोधी पक्षनेते ज्या प्रांतातून येतात त्या विदर्भात नेमकं चाललं तरी काय असा प्रश्न न पडणार तरच नवल. (What if the home minister, opposition party leaders walk in Vidarbha Bobhata of women girls safety)

पश्चिम विदर्भातील आघाडीचे शहर म्हणजे अकोला. सत्तांतरानंतर याच अकोला जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. तर माजी राज्यमंत्री आणि सध्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेले आमदार बच्चू कडू हेसुद्धा याच अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री होते. याच अकोला जिल्ह्यात 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान एका गावगुंडाने अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार केले. गावगुंडाने अल्पवयीन पीडितेचे मुंडन करून सिगारेटचे चटके देण्यासारखे प्रकार केले. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली. पोलिसांनी कारवाईसुद्धा केली. पण प्रश्न हा आहे की, अशा घटना रोखण्यासाठी कुठली पाऊले उचलली जातात? ही घटना ताजी असतानाच अकोला शहरातील संवेदनशील परिसर असणाऱ्या अकोटफैल परिसरात प्रेमविवाहाच्या प्रकरणावरून दोन गट एकमेकांसमोर आले आणि त्याचवेळी त्यांच्याकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेवरून राजकीय आरोपसुद्धा करण्यात आले होते.

- Advertisement -

भंडाऱ्यात डान्स आणि तोही विवस्त्र!

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोबरवाही येथे मंडई निमित्ताने एका कार्यक्रमाचे 17 नोव्हेंबरला आयोजन केले होते. या कार्यक्रमात विवस्त्रावस्थेतील अश्लील डान्स करण्यात आला. या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याआधी दोन वर्षांपूर्वीदेखील नागपूर जिल्ह्यातील उमरेड, कुही, भिवापूर तालुक्यात असाच प्रकार घडला होता. त्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एमआयटीची स्थापना केली होती. पण त्या प्रकरणी कोणतीही कारवाई न झाल्यामुळे भंडारा जिल्ह्यात असे प्रकर होताना दिसत आहेत. तेव्हा आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कोणती पावले उचलतात हे पाहणे गरजेचे आहे. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आगामी हिवाळी अधिवेशनात याबाबत सरकारला धारेवर धरतात का? हे पहावे लागणार आहे.

हेही वाचा : MILK PRICES FALL : दुधाच्या दरात घसरण झाल्याने रयत क्रांती संघटना आक्रमक; शासनाच्या आदेशाची 21 जिल्ह्यात होळी

- Advertisement -

बुलढाण्यातील घटना म्हणजे विकृतीचा कळसच

अकोला, भंडारा या जिल्ह्यातील घटनानंतर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात 6 वर्षीय चिमुकलीवर 50 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती. त्या वृत्ताची छाई वळते न वळते तोच बोराखेडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. बोराखेडी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या नांदुरा तालुक्यातील एका गावात समाजमनाला संतप्त करणारी घटना घडली. एका 17 वर्षाच्या नराधमाने अडीच वर्षीय बालिकेला स्वतःचा शिकार बनवले. या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा : हे चार दशलक्ष डॉलर्स घ्या आणि हिंदू धर्माचा प्रचार करा; अमेरिकेत भारतीयांची घोषणा

नात्याला जाच नात्याचाच

मुंबईत लिव्ह-इनमधील पार्टनरकडून हत्या करण्यात आलेल्या तरुणीचा मृतदेह कुर्ला येथे सुटकेसमध्ये आढळला होता. या घटनेतील आरोपी पोलिसांनी अटक जरी केला असला तरी लिव्ह इन रिलेशनशीपसारखे प्रकार आता घातक ठरू लागल्याचे चित्र आहे. असे असतानाच पालघरमध्ये काही दिवसांपूर्वीच बापाने स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यामध्ये पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर आईच्या तक्रारीवरून बापावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरीकडे व्यसनी आई- वडिलांकडून पैशासाठी पोटच्या गोळ्याची विक्री होत असल्याचा प्रकार मुंबई आणि परिसरातून उघडकीस येत आहे. तेव्हा नात्याला जाच नात्याचाच होत असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -