घरमहाराष्ट्रशिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हाचा निर्णय होईल? उज्ज्वल निकम यांचे सूचक वक्तव्य

शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हाचा निर्णय होईल? उज्ज्वल निकम यांचे सूचक वक्तव्य

Subscribe

मुंबई : खरा राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? याप्रकरणाची गुरुवारी (9 नोव्हेंबर ) निवडणूक आयोगात दुसरी सुनावणी पार पडली. तब्बल दीड तासाच्या सुनावणीनंतर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी माध्यमांशी संवाद साधत आम्ही निवडणूक आयोगाकडे अजित पवार गटांवर फसवणुकीच्या कायद्यान्वये कारवाई करा, अशी मागणी केल्याची माहिती दिली. सध्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी पक्ष कुणाचा यासंदर्भात तर्कवितर्क लावले जात आहे. मात्र ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी राष्ट्रवादी पक्षाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. (Will the party symbol of NCP be decided like Shiv Sena Indicative statement by Ujjwal Nikam)

अजित पवार यांनी 2 जुलै रोजी बंड पुकराले. यावेळी त्यांच्यासोबत 8 मंत्र्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देत मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा केला. सध्या हे प्रकरण निवडणुक आयोगात आहे. या प्रकरणी बोलताना ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम म्हणाले की, निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. परंतु शिवसेनेच्या निकालानंतर या स्वायत्त संस्थेविषयी जनमानसात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. परंतु पक्षांचं अधिकृत निवडणूक चिन्ह कुणाला द्यायचं हा निर्णय घेताना त्या राजकीय पक्षात फूट पडली आहे का? हे पाहिलं जात असल्याचे उज्ज्वल निकम म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – राज ठाकरेंना दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाने 2010 मधील ‘तो’ गुन्हा केला रद्द

राष्ट्रवादीच्या सुनावणीवर बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. त्यामुळे पक्षातील दोन गट पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा करत आहेत. त्यामुळे या प्रकरणी सुनावणी करताना पक्षाची घटना आणि निवडून आलेले प्रतिनिधी हे महत्त्वाचे मुद्दे असतील, असे निकम यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रकरणी निकाल काय लागेल याचा अंदाज करता येत नसला तरी शिवसेना पक्षासंदर्भात निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला त्याचाच कित्ता गिरवला जाणार की, निवडणूक आयोगाकडे आणखी वेळ मागितला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, असं मत उज्जव निकम यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केले.

- Advertisement -

निवडणूक चिन्हाबाबत निकाल देताना दोन गोष्टी पाहिल्या जातात

पक्षांचं अधिकृत निवडणूक चिन्ह कुणाला द्यायचं यासंदर्भात निकाल देताना निवडणूक आयोग प्रामुख्याने दोन गोष्टींचा विचार करतो. एक म्हणजे पक्षाच्या घटनेनुसार संघटना कुणाच्या ताब्यात आहे आणि दुसरं असं की, त्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे बहुमत कुणाकडे आहे. आज अजित पवार यांच्याकडे लोकप्रतिनिधींचे बहुमत दिसत आहे. परंतु त्याबाबतची प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर दाखल झाली आहेत का? हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे उज्ज्वल निकम यांनी सांगितले.

हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांची वाऱ्यावरची वरात; मध्यप्रदेश दौऱ्यावरून राऊतांनी लगावला टोला

निकाल कोणत्या बाजूने लागणार हे सांगणे अवघड

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने त्यांना दिलं आहे. त्यामुळे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हाचा निर्णय होईल का? असा प्रश्नही उज्वल निकम यांनी विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, निवडणूक आयोग निकाल कोणत्या बाजूने देईल हे सांगणे अवघड आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -