घरमहाराष्ट्रनागपूरWinter Session : विदर्भाच्या प्रस्तावावरून उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

Winter Session : विदर्भाच्या प्रस्तावावरून उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

Subscribe

विरोधी पक्षाला विदर्भात येऊन, विदर्भाचा विसर पडावा हेच दु:ख अधिक आहे. पण आम्ही विदर्भाला विसरणार नाही, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली.

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटाच दिवस आहे. आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. त्यावेळी विरोधकांना विदर्भाच्या प्रश्नांचा विसर पडला आहे, आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करताना केला. हिवाळी अधिवेशनचा कालावधी आणि विदर्भाच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानसभेत खडाजंगी झाली.

अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर जयंत पाटील म्हणाले, “विदर्भाचा विषय हा सत्ताधारी पक्षाने मांडल्यामुळे आम्ही तो मांडला नाही. अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितले की, प्रस्ताव वेळ नसेल तर मागे घेतो. आजूनही सभागृह संपले नाही. आजच्या ऑर्डर ऑद डेमध्ये विदर्भाचा प्रस्ताव असून त्यावर सभागृहात चर्चा होणार आहे, असे गृहीत धरूण आम्ही सर्वजण बसून आहोत, असे जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Sadan Case : Chhagan Bhujbal यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, आरोपी होणार माफीचे साक्षीदार

अधिवेशनाचा कामकाज 10 दिवसात का?

विधिमंडळाचे कामकाजाला 10 दिवसांचा कालावधी का दिला, असा सवाल जयंत पाटील यांनी सरकारला केला. जयंत पाटील म्हणाले, ” दहा दिवसांच्या अधिवेशनात सत्तधाऱ्यांकडून दोन प्रस्ताव आणि विरोधकांकडून एक प्रस्ताव, एवढे मर्यादीत अधिवेशन का आहे? म्हणून आम्ही बोलत होतो की, एक महिना अधिवेशन घ्या. आम्हाला नागपूरची हवा जास्त दिवस खाऊ द्या, अशी टीका जयंत पाटील यांनी सरकारवर केली.

- Advertisement -

हेही वाचा – Winter Session : कांदा प्रश्नावर शिंदे सरकारची दिल्लीवारी म्हणजे केवळ देखावा, नाना पटोलेंची टीका

सभागृहात एक आणि बाहेर वेगळे बोलायचे धंदे बंद करा; पवार

जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपावर अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले, “कोणी कसे बलोयाचे हे आम्हाला कळते. काल कामकाज सल्लागार समितीमध्ये अंतिम आठवडा प्रस्ताव आला. त्यावेळी विरोधी पक्षला कळाले होते की, अधिवेशन संपणार आहे. मग विरोधकांनी सांगायला हवे होते की, आम्हाला अंतिम आठवडा प्रस्ताव मांडायचा नाही. सभागृहात एक बोलायचे आणि बाहेर एक बोलायचे हे धंदे बंद करा.”

हेही वाचा – ‘त्या’ आरोपावर सुषमा अंधारेंनी दिलगिरी व्यक्त न केल्यास दाखल होणार हक्कभंग; उपसभापतींकडून स्पष्ट

विदर्भाबाबत उत्तर आलेच पाहिजे – अजित पवार

विदर्भासंदर्भात अजित पवार म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही सर्वांनी ठरवले की, विदर्भाबाबत उत्तर आलेच पाहिजे. तो विदर्भाचा अधिकार आहे. म्हणून आम्ही विधान परिषदेत प्रवीण दरेकरांना सांगितले की, तुम्ही विदर्भाचा प्रस्ताव मांडा आणि प्रवीण दरेकरांनी विदर्भाचा प्रस्ताव मांडला आहे. मला थोड्याच वेळापूर्वीच प्रसाद लाड यांनी सांगिले की, अतिशय चांगल्या पद्धतीने विदर्भातील प्रश्न मांडण्याचे काम प्रवीण दरेकरांनी केले आहे. विधान परिषदेत देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहे. ते उत्तर विधान परिषदे पुरते मर्यादीत नाही तर संपूर्ण विदर्भातील जनते करिता देवेंद्र फडणवीसांचे उत्तर आहे आणि विधानसभेत कायदा सुव्यवस्थेसंदर्भातील उत्तर आहे”, असे अजित पवारांनी विधानसभेत सांगितले.

हेही वाचा – Devendra Fadnavis : NCRB चा Report कसा वाचतात तेच आज शिकवतो; फडणवीसांचा विरोधकांवर घणाघात

म्हातारी मेल्याच दुःख नाही – फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सभागृहात आम्ही शेतकऱ्यांसदर्भात प्रस्ताव होता, तरी पण तुम्ही शेतकऱ्यांसदर्भात प्रस्ताव दिला. यामुळे म्हातारी मेल्याच दुःख नाही. पण म्हातारी मेल्यापेक्षा काळ सोकावतो याचे दु:ख जास्त आहे. विरोधी पक्षाला विदर्भात येऊन, विदर्भाचा विसर पडावा हेच दु:ख अधिक आहे. पण आम्ही विदर्भाला विसरणार नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी विरोधकांवर केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -