घरमहाराष्ट्रनागपूरWinter Session : विधान परिषदेतही अवकाळीचा मुद्दा गाजला; सत्ताधारी-विरोध आमनेसामने

Winter Session : विधान परिषदेतही अवकाळीचा मुद्दा गाजला; सत्ताधारी-विरोध आमनेसामने

Subscribe

शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानावर बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्ला केला.

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज शुक्रवारी (8 डिसेंबर) दुसऱ्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानावर जोरदार गदारोळ झाला. विरोधकांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी लावून धरत सरकारला घेरलं. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले. (Winter Session The issue of untimely weather also prevailed in the Legislative Council Incumbent-opposition face-off)

शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानावर बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्ला केला. ते म्हणाले की, राज्यात मागील आठ दिवसांपासून निसर्गाचा कोप झाला आहे. यात मोठया प्रमाणात शेतकऱ्यांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे गारपीट व अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. अंबादास दानवे आज 289 अनव्ये सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलत होते.

- Advertisement -

पुढे ते म्हणाले की, राज्यातील संभाजीनगर, जळगाव, पालघर, नागपूर, हिंगोली, नांदेड व नाशिकसह अनेक जिल्ह्यात मोठया प्रमाणात गारपीट व अवकाळीने थैमान घातले आहे. यामुळे द्राक्ष, कलिंगड, संत्री, मोसंबी, टोमॅटो व कापसाची बोंड भिजली आहेत. सरकारने 10 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे, ती नेमकी कोणत्या नुकसानासाठी केली याबाबत भूमिका स्पष्ट करावी, शेतकऱ्यांना अग्रीम पीक विम्याची रक्कम मिळाली पाहिजे, अशी मागणी देखील दानवे यांनी आज सभागृहात लावून धरली. सोबतच उत्तर महाराष्ट्रात केळी व विदर्भात कापसाचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले असताना सरकारने त्यासाठी कोणतीही मदत जाहीर केली नसल्याकडे दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी भाव वाढीसाठी केलेल्या मागणीचा सरकारने सकारात्मक विचार करावा अशी सूचनाही दानवे यांनी सरकारला केली.

हेही वाचा : मलिकांवरील फडणवीसांच्या पत्रास्त्रावर राऊतांचा टोला; “बाजू बाजूला बसून…”

- Advertisement -

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सभागृहात नसल्याने सभागृह तहकूब

विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी सभागृहात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्री नसल्याने त्यांना आता सभागृहात बोलवा नाही तर तोपर्यंत सभागृह तहकूब करा अशी मागणी यावी विरोधकांनी यावेळी लावून धरली. त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे काही काळासाठी सभागृह तहकूब केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -