घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रघर रिकामे करून त्यावर कब्जा मिळवण्याच्या इराद्याने महिलेला दमदाटी, शिवीगाळ

घर रिकामे करून त्यावर कब्जा मिळवण्याच्या इराद्याने महिलेला दमदाटी, शिवीगाळ

Subscribe

नाशिक : पाथर्डी फाटा परिसरात टोळक्याने एका रो हाऊसमध्ये बेकायदा प्रवेश करून घर खाली करण्याची धमकी देत कुटुंबियांना मारहाण करीत महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला त्यांच्या भावाच्या रो हाऊसमध्ये ७५ वर्षीय वडील, बहिणीसोबत राहत होती. ऑगस्ट २०२२ मध्ये पीडितेच्या भावाने संशयित गिरीश धनराज बंब यांच्याकडून रो हाऊस व खालील शॉप असे साठेखत करून खरेदी केले होते. परंतु, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून धनराज बंब पीडितेच्या घरी येऊन हा व्यवहार मुलगा गिरीशने त्यांच्या संमतीशिवाय केल्यामुळे घर व शॉप खाली करण्यास सांगत होते.

- Advertisement -

शनिवारी (दि.१) एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता पीडित महिला त्यांचे वडील, बहीण घरी असताना संशयित धनराज बंब व त्यांच्या मुलासह इतर तीन ते चार जण शिवीगाळ करत होते. त्यांनी घराच्या बाहेर असलेल्या लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून बेकायदेशीररित्या घरात प्रवेश करुन घराच्या वरच्या मजल्यावर येऊन पीडित महिला व त्यांच्या घरातील सर्वांना आताच्या आता घर खाली करण्याची धमकी दिली. त्यानंतर विनयभंग केल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. त्यांना सोडवण्यासाठी त्यांची बहीण आल्याने तिलाही संशयितांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी त्यांनी आरडा ओरड केल्याने संशयित घराच्या बाहेर निघून गेले. पुढील तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -