घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशहरात एकाच दिवशी आत्महत्येच्या तीन घटना; का होतंय असे? काय आहेत कारणे?

शहरात एकाच दिवशी आत्महत्येच्या तीन घटना; का होतंय असे? काय आहेत कारणे?

Subscribe

नाशिक : शहरात दिवसेंदिवस एकटेपणा, प्रेमभंग, वाढत्या अपेक्षा, छळ व नैराश्यातून आबालवृद्धांमध्ये गळफास व विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याच्या घटनांत वाढ होत आहे. वाढत्या आत्महत्येच्या घटनांमुळे कुटुंबीय व नातेवाईकांमध्ये चितेंचे वातावरण आहे. शहरात सोमवारी (दि.३) एकाच दिवशी तीन जणांनी जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी भद्रकाली, सरकारवाडा व उपनगर पोलीस ठाण्यांत नोंद करण्यात आल्या आहेत.

विकास शिवाजी वालझाडे (वय ३१, रा. उमेश बंगला, गणेश नगर, व्दारका, नाशिक), जयसिंग किसन टिळे (४९ , रा. टिळेवाडा, लोणार लेन, रविवार कारंजा, नाशिक), सुरेश ज्ञानेश्वर महाले (२२, रा. पूजा एव्हेन्यू सोसायटी, म्हसोबाब मंदिराबाजूला, उपनगर, नाशिक) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

पहिल्या घटनेनुसार, विकास वालझाडे यांनी घरातील दुसर्‍या मजल्यावर गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दुसर्‍या घटनेनुसार, जयसिंग टिळे यांनी राहत्या घरी विषप्राशन करून आत्महत्या केली. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले.

याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अहिरे करीत आहेत.
तिसर्‍या घटनेनुसार, सुरेश महाले याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अनेकजण तात्पुरता ताणतणाव, आर्थिक अडचणी, कौटुंबिक वादातून आत्महत्या करत आहेत. आत्महत्या रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे. एखादा व्यक्तीच्या बोलण्यात बदल झाल्याचे दिसल्यास इतरांनी त्याच्याशी संवाद साधावा व बोलते करावे. त्यातून संबंधित व्यक्ती आत्महत्येपासून परावृत होईल. : डॉ. उमेश नागापूरकर, मानसोपचार तज्ज्ञ, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -