घरताज्या घडामोडीमहीलांना दबंगगिरी करावीच लागते

महीलांना दबंगगिरी करावीच लागते

Subscribe

भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा टोला

माजी मंत्री पंकजा मुंडे आणि भाजप यांच्यातील अंतर्गत सुप्त संघर्ष सर्वश्रृत आहे. गेल्या दसरा मेळाव्यातही त्यांनी शाब्दीक प्रहार करत पक्षातील नेत्यांवरच शरसंधाण साधले. या पार्श्वभुमीवर नाशिक दौर्‍यावर असलेल्या मुंडे यांनी रूग्णालयाच्या भूमिपूजन सोहळयानिमित्त आमदार देवयानी फरांदे यांच्या कामाचे कौतुक करत महिलांना कुठलीही गोष्ट सोपी नसते, याकरीता कधी संघर्ष तर कधी दबंगगिरी करावीच लागते असा टोला लगावला. त्यामुळे पंकजा यांचा रोख नेमका कुणाकडे होता याविषयी चर्चांना उधाण आले आहे.

नाशिक येथील संदर्भ सेवा रूग्णालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळयाप्रसंगी सोमवारी (दि. १) भाजप नेत्या पंकजा मुंडे, जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ हे दोघे ओबीसी नेते एकाच व्यासपीठावर आले. त्यामुळे हे दोघे नेते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. याप्रसंगी मुंडे म्हणाल्या की, महिलांना कोणतेही काम करणे सोपं नसते. सहजासहजी त्यांचे कामही होत नाही. याकरीता खुप पाठपुरावा ही करावा लागतो. अनेकदा दबंगगिरीही करावी लागते. आमदार फरांदे यांनी अशाच पध्दतीने आपल्या मतदारसंघात निधी आणून विकास कामे उभारली याचा आपल्याला आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान केंद्रिय मंत्रीमंडळ विस्तारामध्ये खासदार प्रितम मुंडे यांना डावलण्यात आल्याने मुंडे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी उमटली. पंकजा यांनी देखील भगवान गडावरून अनेकदा आपली नाराजी जाहीररित्या व्यक्त केली. त्यामुळे मुंडे आणि भाजप यांच्यातील सुप्त संघर्ष अजूनही सुरूच असल्याचे दिसून येते. यापार्श्वभुमीवर त्यांचा नाशिक दौरयाकडे लक्ष लागून आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -