घरताज्या घडामोडीYashomati Thakur : ज्या ठिकाणी निधी नाही, तिथे लोकांचे हाल - यशोमती ठाकूर

Yashomati Thakur : ज्या ठिकाणी निधी नाही, तिथे लोकांचे हाल – यशोमती ठाकूर

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी सर्व आमदारांना निधी वाटप केला आहे. यावेळी काही आमदारांना निधी मिळाला आहे. तर काहींना मिळालेला नाही. त्यामुळे निधी वाटपाच्या मुद्यावरून पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडूनही प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी निधी नाही, तिथे लोकांचे हाल, असं काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

विधिमंडळातील बाहेरील प्रांगणात यशोमती ठाकूर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, मागील पाच वर्षांपासूनची राजकीय परिस्थिती याआधी कधीही पाहिली नव्हती. पहिले महाविकास आघाडी होती, आता महायुती आहे. आमच्यासोबतचे काही लोकं आता तिकडे बसले आहेत. महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा अधिकार कुणालाच नाहीये. जे राष्ट्रवादी आमच्यासोबत बसत आहेत, त्यांनाही निधी मिळतोय. आमच्यातील एक ते दोन जणांना निधी देण्यात आलाय. पण काही लोकांना देण्यात आलेला नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे आमदार आहेत, त्यांनाही काही देण्यात आलेलं नाही. महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी समान निधी वाटप महत्त्वाचा आहे.

- Advertisement -

जेव्हा पाऊस पडतो. तेव्हा तो एका विशिष्ट मतदारसंघात पडतो का? दुसऱ्या मतदार संघात पडत नाही का? ज्या ठिकाणी तुम्ही निधी देत नाहीयेत, त्याठिकाणी लोकांचे हाल होताहेत. ते फक्त सत्ताधाऱ्यांमुळे होत आहेत. हे लोकं माफ करणार नाही, हे फक्त लक्षात ठेवा, असं म्हणत ठाकूर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

कर्नाटकमध्येही तुम्ही अशाच प्रकारच्या गोष्टी करत होतात. पण कर्नाटकाच्या जनतेने उत्तर दिलं. तसंच महाराष्ट्राची जनताही सत्ताधाऱ्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असंही ठाकूर म्हणाल्या.

- Advertisement -


हेही वाचा :निधी वाटपावरून भाजपा आमदाराचा राजीनाम्याचा इशारा; फडणवीसांना लिहिले पत्र


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -