घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपक्ष फोडणाऱ्यांनी टोलनाका फोडण्यावर बोलू नये; संदीप देशपांडेचे भाजपला प्रत्युत्तर

पक्ष फोडणाऱ्यांनी टोलनाका फोडण्यावर बोलू नये; संदीप देशपांडेचे भाजपला प्रत्युत्तर

Subscribe

दोन दिवसांपूर्वी मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नाशिक-नगर दौऱ्यादरम्यान सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोल नाका मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडला होता.

मुंबई : आम्हाला जे करायचे ते आम्ही करतो. आम्हाला कुणाकडून काही शिकण्याची गरज नाही. तर ज्यांनी आयुष्यभर इतरांचे पक्ष फोडले त्यांनी टोलनाका फोडण्यावर बोलू नये असे प्रत्युत्तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपला दिले आहे.

दोन दिवसांपूर्वी मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नाशिक-नगर दौऱ्यादरम्यान सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोल नाका मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडला होता. टोल नाक्यावर अमित ठाकरे यांचा अपमान झाला, म्हणून टोल नाका फोडला असे मनसे कार्यकर्त्यांचे सांगितले होते.

- Advertisement -

तर या प्रकरणावर बोलताना अमित ठाकरे म्हणाले होते की, टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांची भाषा उद्धट होती. फास्टटॅग असूनही गाडी बराचवेळ थांबवली. टोलनाक्याची टेक्निकल अडचण होती. मॅनेजरसह कर्मचाऱ्याची भाषा उद्धटपणाची होती असे सांगत राज ठाकरेंमुळे अनेक टोलनाके बंद झाले. माझ्यामुळे आणखी एक वाढला ही टिप्पणीही केली होती.

भाजप महाराष्ट्रने ट्वीट करीत केली अमित ठाकरेंवर टिका
भाजप महाराष्ट्र या अधिकृत ट्वीटर हॅंडवर एक व्हिडीओ प्रसारीत करत भाजपने अमित ठाकरे यांच्यावर टिका करताना म्हटले आहे की, फास्टटॅगची समस्या असल्यामुळे अमित ठाकरे यांची गाडी फक्त तीन ते साडेतीन मिनिटं थांबवल्याचे सांगितले. टोल नाका फोडल्याचे समजल्यानंतर अमित ठाकरे यांच्या चेहऱ्यावर असुरी आनंद दिसला अशीही टिप्पणी भाजपाने या व्हिडीओतून केली. तर अमित ठाकरे यांच्यावर खोट बोलण्याचाही आरोप केला आहे. अमित ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना टोल नाका फोडायला भाग पाडले, असेही व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -


ठाकरेंवरील टिकेला देशपांडेचे उत्तर
अमित ठाकरे यांच्यावर टिका करणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसेचे नेदे संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्र भाजपला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, आम्ही दादागिरी करीत नाही. दादागिरी करणे हे आम्हाला कोणाकडून शिकण्याची गरज नाही. तर ज्यांनी आयुष्यभर इतरांचे पक्ष फोडले त्यांनी टोलनाक्यावर बोलू नये नाही. तर भाजपनेच सत्ते येण्याआधी महाराष्ट्र टोलमुक्त करू असे आश्वासन दिले होते. ते आता विसरले का?, टोलनाका फोडण्यावर बोलणारे मणिपूर हिंसाचारावर का थोबाड उघडत नाहीत असेही टिका प्रसारमाध्यमांशी बोलतांना भाजपवर केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -