घरमहाराष्ट्रबीडमध्ये तरुणाची गळफास लावून आत्महत्या

बीडमध्ये तरुणाची गळफास लावून आत्महत्या

Subscribe

बीडमध्ये अभिजित देशमुख या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. घराजवळील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली असून आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहली होती. या चिठ्ठीत औषधाचा खर्च, बँकेचे कर्ज आणि मराठा आरक्षण या कारणामुळे आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे.

बीडमध्ये तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. केज तालुक्यातील विटा गावामध्ये राहणाऱ्या अभिजित देशमुख या तरुणाने आत्महत्या केली आहे. विज्ञान शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेऊन देखील अभिजितला नोकरी मिळत नसल्याने तो अस्वस्थ झाला होता. तसंच त्याच्यासह कुटुंबियांवर बँकेचे थकीत कर्ज होते. आज सकाळी त्याने घराजवळील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट देखील लिहिली होती.

अभिजीतने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी

आत्महत्येपूर्वी लिहली चिठ्ठी

सध्या आरक्षण मागणीच्या विविध आंदोलनात त्याने सक्रिय सहभाग घेतला. आरक्षण मागणीसाठी सहा बळी गेल्यानंतर “मी देखील या लढाईतील शिपाई असून बलिदान देणार” असल्याचे त्याने सोमवारी रात्री बोलून दाखवले होते. आज सकाळी घराजवळील त्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. त्याच्या खिशात चिठ्ठी सापडली असून औषधांचा खर्च, बँकेचे कर्ज आणि मराठा आरक्षण या कारणाने आत्महत्या करत असल्याचा त्यात उल्लेख आहे.

- Advertisement -

अंत्यसंस्कार करण्यास नकार

अभिजीत देशमुख याच्या कुटुंबियांना मदतीचे ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करायचे नाहीत असा पवित्रा विडा ग्रामस्थांनी घेतला आहे. अभिजीतच्या कुटुंबियांना शासनाने मदतीचे ठोस आश्वासन दिल्याशिवाय अंत्यसंस्कार आणि मृतदेहाची उत्तरीय तपासणी करायची नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. दरम्यान, बाजार बंद ठेवून ग्रामस्थांनी विडा आरोग्य केंद्राबाहेर गर्दी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -