घरमहाराष्ट्रअहमदनगरमध्ये ७५ विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोची लागण

अहमदनगरमध्ये ७५ विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोची लागण

Subscribe

अहमदनगरमध्ये दुषीत पाण्यामुळे ७५ विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. या विद्यार्थ्यांवर घारगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर ५ विद्यार्थ्यांना प्रवरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अहमदनगरमध्ये ७५ विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. अकोले तालुक्यातील पिंपळदरी गावातील ही घटना आहे. शासकीय आश्रम शाळेतील आणि वारकरी संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाबचा त्रास होत असल्याने त्यांना संगमनेरमधील घारगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दुषीत पाण्यातून गॅस्ट्रोची लागण

पिंपळदरी या गावामधील शासकीय आश्रम शाळेतील २५ तर रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेतील ४५ विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना काल रात्रीपासून पोटदुखी, उलट्या आणि जुलाबचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना घारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना दुषीत पाण्यातून गॅस्ट्रोची लागण झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर ५ विद्यार्थ्यांना जास्त त्रास होत असल्याने त्यांना प्रवरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -