घरमहाराष्ट्र५ वर्ष पगार नाही; तरुण शिक्षकाची आत्महत्या

५ वर्ष पगार नाही; तरुण शिक्षकाची आत्महत्या

Subscribe

आज ना उद्या पगार होईल या आशेवर पांचाळ कुटुंब गेल्या ५ ते ६ वर्षांपासून आपला संसार चालवत होते.

पगार वेळेवर होत नाही आणि तो वेळेवर होण्याची शाश्वतीही नसल्यामुळे, नांदेडमधील एका तरुण शिक्षकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेडच्या अर्धापूर शहरात राहणाऱ्या चंद्रशेखर पांचाळ या तरुण शिक्षकाने पगार होत नसल्यामुळे निराश होऊन आपल्या राहत्या घरी गळफान लावून घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी पांचाळ याने लिहीलेल्या चिठ्ठीमध्ये संस्था चालकाला दिलेले पैसे परत घ्या असं नमूद करण्यात आलं होतं. एम. ए. बीएडपर्यंत शिक्षण घेतलेल्या पांचाळ याचे ४ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक लहान मुलगी देखील आहे. दरम्यान, आज ना उद्या पगार होईल आणि आपल्या संसाराला आधार मिळेल या आशेवर हे कुटुंब गेल्या ५ ते ६ वर्षांपासून जगत होते. पांचाळ चिंचगव्हाण येथील एका खासगी शाळेत शिक्षकाची नोकरी करत होते, तर त्यांची पत्नी स्पर्धा परिक्षेची तयारी करीत आहे.


वाचा :अमेरिकेकडून पाकिस्तानची कानउघाडणी

राज्यातील बहुतांशी खासगी शाळेतील शिक्षकांना अनेक दिवस पगाराविना काम करावे लागते. बऱ्याच ठिकाणी नोकरीसाठी संस्थाचालकाला देणगीदेखील द्यावी लागते. शाळेला आज ना उद्या आनुदान मिळेल आणि आपला पगार होईल, या आशेवर शिक्षक नियमीतपणे त्यांची नोकरी करत राहतात. नांदेडचे चंद्रशेखर पांचाळही अशाच परिस्थीत आपली नोकरी करत होते. मात्र, बराच मोठा काळ पगार न झाल्यामुळे संसार चालवण्यासाठी त्यांची ओढाताण होत होती. त्यातही इतक्या वर्षांचा साठलेला पगार नक्की कधी होईल? याचीही काही शाश्वती नव्हती. या परिस्थीमुळे खचून गेलेल्या आणि नैराश्याच्या विळख्यात अडकलेल्या पांचाळ यांनी आत्महत्येचा पर्याय स्विकारला. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील खासगी शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -