घरमहाराष्ट्रमराठा आरक्षणासाठी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या? विनोद पाटलांच्या दाव्याने खळबळ

मराठा आरक्षणासाठी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या? विनोद पाटलांच्या दाव्याने खळबळ

Subscribe

मागील अनेक वर्षांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना त्यात पुन्हा ठिणगी पडली ती जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाने.

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणासह इतर धनगर, ओबीसींचा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत असतानाच एका मराठा तरुणांने आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचा दावा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू केला आहे. सुनील कावळे (45 ) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. (Youth committed suicide by hanging himself for Maratha reservation? Vinod Patels claim stirs up excitement)

मागील अनेक वर्षांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना त्यात पुन्हा ठिणगी पडली ती जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाने. या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर पुन्हा हा मुद्दा चांगलाच पेटला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांचे उपोषण सोडवले असले तरी जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. अशातच आता कालपासून मनोज जरांगे पाटील मुंबई दौऱ्यावर असतानाच आज मराठा आरक्षणासाठी तरुणांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. तर आता जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत या आत्महत्यांना सरकारच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : SUNIL KAWALE SUICIDE : सरकारमुळेच बळी जातायेत; मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल

उड्डाणपुलावर गळफास घेऊन केली आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी मुंबईला जातोय आणि परत येतो असे म्हणत अंबड तालुक्यातील सुनील कवळे या तरुणांने मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुनील कावळे जालना जिल्ह्यातील रहिवाशी होते. त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली आहे. मध्यरात्री त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : “…संपवून टाकाल का?”, सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

विनोद पाटील यांच्या दाव्यामुळे खळबळ

जालना जिल्ह्यातील तरुणांने मुंबईत येऊन आत्महत्या केली. ही आत्महत्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच आहे असा दावा विनोद पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. आत्महत्या करणारी व्यक्ती ही मूळची अंबड तालुक्यातील असून त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -