Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र भंडारा जिल्हा रुग्णालयाचा कहर! आधी चिमुकले आगीच्या भक्षस्थानी, आता तरुणाचा मृत्यू

भंडारा जिल्हा रुग्णालयाचा कहर! आधी चिमुकले आगीच्या भक्षस्थानी, आता तरुणाचा मृत्यू

मृताच्या कुटुंबियांनी दोषी डॉक्टर व जिल्हा शल्यचिकित्सकांवर कारवाई करण्याची केली मागणी

Related Story

- Advertisement -

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीने  १० बालकांचा जीव घेतल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा रुग्नालयाच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या जिल्हा सामान्य रुग्णालयात वेळीच उपचार न मिळाल्याने तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. विष प्राशन केलेल्या या तरुणाला उपचारांसाठी रुग्णालयात भर्ती करण्यात आले परंतु रुग्णालय प्रशासनाने हलगर्जीपणा केल्यानेच तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप  कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. यानंतर मृत तरुणाच्या कुटुंबियांनी जिल्हा शल्यचिकित्सक कक्षाच्या प्रवेशद्वारासमोर मृतदेह ठेवत चार तास ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर अधिकाऱ्यांकडून कुटुंबियांना आश्वासन मिळाल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे

चंद्रशेखर तुमसरे (३२, गोंडसावरी, लाखनी) असे मृत तरुणाचे नाव असू त्याने १९ जानेवारीला उंदीर मारण्याचे औषधाने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर मध्यरात्री १ वाजता त्यांची प्रकृती खालवल्याने कुटुंबियांनी त्याला लाखनीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती चंद्रशेखरची प्रकृती अधिक बिकट झाल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु या रुग्णालयातही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे उपचार झाले नसल्याचे आरोप चंद्रशेखरच्या कुटुंबियांनी केला आहे. चंद्रशेखरची प्रकृती अधिक ठासळल्याने २० जानेवारी रात्री १० वाजता चंद्रशेखरला नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला. यावेळी कुटुंबीय रुग्णवाहिकेच्या शोधात होते मात्र त्याची प्रकृती अधिकच बिकट झाली. काही वेळातच त्याने हालचाली बंद केल्या. यावेळी उपस्थिती नर्सने डॉक्टरांना बोलवले. पण तोपर्यंत त्याने प्राण सोडले होते. डॉक्टरांनीही तपासून चंद्रशेखरला मृत घोषित केले.

- Advertisement -

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय डॉक्टरांनी चंद्रशेखरच्या पोटातील विषारी पाणी न काढून त्याला फक्त सलाईनवर ठेवले. परंतु त्यानंतर कोणतेही उपचार चंद्रशेखरवर करण्यात आले नाही. त्यामुळे वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने त्याचा जीव वाचू शकला नाही. त्यामुळे दोषी डॉक्टर व जिल्हा शल्यचिकित्सकांवर कारवाई करा अशी मागणी कर चंद्रशेखरच्या कुटुंबियांनी मृतदेह डॉक्टरांच्या केबिनसमोर ठेवला. यानंतर पोलिसांनी चंद्रशेखरच्या भावाचा जबाब नोंदवून घेत. व अधिकाऱ्यांनी चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

- Advertisement -