घरमुंबईव्हॉट्सअ‍ॅपवर एकाच वेळी १०० मीडिया फाईल्स पाठवता येणार

व्हॉट्सअ‍ॅपवर एकाच वेळी १०० मीडिया फाईल्स पाठवता येणार

Subscribe

मेटाकडून युजर्ससाठी ३ नवी फीचर्स, डॉक्यूमेंट कॅप्शन, मोठा ग्रुप सब्जेक्ट आणि डिस्क्रिप्शनचीही सुविधा

व्हॉट्सअ‍ॅपवर एकाच वेळी आता १०० मीडिया फाईल्स पाठवणे ग्राहकांना शक्य होणार आहे. मेटाने व्हॉट्सअ‍ॅपसाठी एकाच वेळी ३ नवीन फीचर्स लाँच केली आहेत. ही सर्व फीचर्स अँड्रॉईड युजरसाठी असून यात डॉक्यूमेंट कॅप्शन, मोठा ग्रुप सब्जेक्ट आणि डिस्क्रिप्शनचा समावेश आहे. नवीन अपडेट केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवरील हे तिन्ही फीचर्स युजरना वापरता येणार आहेत.

नवीन अपडेटनंतर आता ज्यावेळी कोणालाही डॉक्यूमेंट शेअर कराल त्यावेळी कॅप्शनसुद्धा लिहू शकाल. सर्वात आधी फोटो आणि व्हिडीओसोबत कॅप्शनचे ऑप्शन येत होते. आधी छोट्या कॅप्शनचा ऑप्शन होता, परंतु आता मीडिया फाईलसोबत मोठे कॅप्शनसुद्धा लिहिता येऊ शकतील. कॅप्शनमध्ये शेअर होणार्‍या फाईलसंबंधी संपूर्ण माहिती देऊ शकाल.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅपने नवीन अपडेटसोबत अवतार स्टिकर आणले आहे. आता अवतारला एडिट करण्यासाठी ३६ प्रकारे स्टिकर्स मिळतील. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप आणखी एका नवीन फीचरवर काम करीत आहे. हे जारी केल्यानंतर ओरिजनल क्वालिटीमध्ये फोटो पाठवता येऊ शकतो. म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवल्यानंतरही फोटोची क्वालिटी खराब होणार नाही. सध्या व्हॉट्सअ‍ॅप पाठवण्याआधी फाईलला कंप्रेस करते. त्यामुळे लवकरच युजर्सना आणखी एक दिलासा मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -