घरमुंबईफुकट्या रेल्वे प्रवाशांकडून 11 कोटींचा दंड वसूल

फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून 11 कोटींचा दंड वसूल

Subscribe

पश्चिम रेल्वेने विनातिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांविरोधात मोहीम राबवली होती. या मोहिमेत फेब्रुवारी महिन्यात 11 कोटी 15 लाख रुपयांचा दंड पश्चिम रेल्वेने वसूल केलेला आहे. ही मोहीम रेल्वे प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी तसेच विनातिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांना लगाम लावण्यासाठी नेहमी चालवली जाते.

फेब्रुवारी महिन्यात विनातिकीट आणि नोंद न केलेल्या सामानांसह बेकायदेशीर प्रवास केल्याच्या एकूण 2.36 लाख केसेस दाखल झाल्या होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दंडाच्या रकमेत 1.78 टक्केे वाढ झालेली आहे. फेब्रुवारी महिन्यात 318 भिकारी आणि 428 अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंड आकारुन त्यातील 90 जणांना तुरुंगात पाठविण्यात आले. तसेच महिलांच्या डब्यातून प्रवास करणार्‍या 12 वर्षांवरील 44 मुलांना पकडण्यात आले. यामध्ये तिकीट दलालाविरोधातील मोहिमेमध्ये 257 जणांना पकडण्यात आले.

- Advertisement -

तिकीट काढल्याशिवाय प्रवासाला सुरुवात करू नका, अशा सूचना पश्चिम रेल्वेद्वारे सातत्याने केल्या जातात. मात्र तरीही पश्चिम रेल्वेमार्गावर फुकट्या प्रवाशांची संख्या खूप वाढत जात आहे. ही पश्चिम रेल्वेची एक चिंतेची बाब आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -