घरमुंबईएमबीएच्या 1228 विद्यार्थ्यांची होणार तपासणी

एमबीएच्या 1228 विद्यार्थ्यांची होणार तपासणी

Subscribe

187 बोगस विद्यार्थ्यांमुळे सीईटीचा निर्णय

व्यवस्थापन पदव्युत्तर (एमबीए) अभ्यासक्रमाच्या प्रवेशादरम्यान खोटी गुणपत्रिके व माहिती सादर केल्याची 187 प्रकरणे उघडकीस आल्यानंतर सीईटी सेल आणि तंत्रशिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे गतवर्षीही अशाच पद्धतीने प्रवेश झाले आहेत का? हे पाहण्यासाठी अ‍ॅटमा प्रवेश यंत्रणेकडून प्रवेश घेतलेल्या १२२८ विद्यार्थ्यांची गुणपत्रिकांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे गतवर्षी बनावट कागदपत्रे सादर करून घेतलेल्या विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले आहेत.

राज्य सीईटीबरोबरच एमबीएची केंद्रीय प्रवेश परीक्षा एम्स टेस्ट फॉर मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन (अ‍ॅटमा) आदी यंत्रणेमार्फत प्रवेश राज्यातील कॉलेजात प्रवेश दिले जातात. यंदा विद्यार्थ्यांचे अचानक पर्सेन्टाइल वाढल्याचे दिसल्याची तक्रार आल्यानंतर या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. १८७ विद्यार्थ्यांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याचे उघडकीस आले. त्यापैकी २५ विद्यार्थ्यांना प्रवेशही देण्यात आले होते. खोटी माहिती सादर करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये १५० विद्यार्थ्यांनी चुकीची गुणपत्रिका तर ३७ विद्यार्थ्यांनी चुकीचे नाव व चुकीची माहिती सादर केल्याचे पडताळणीमध्ये आढळून आले. बोगस कागदपत्रे सादर करून प्रवेश घेतल्याचे लक्षात आल्यानंतर सीईटी प्रवेश समितीकडून हे प्रवेश रद्द करण्यात आले.

- Advertisement -

यामुळे गतवर्षीही विद्यार्थ्यांनी असाच प्रयत्न केला होता का? यासंदर्भातील माहिती घेण्यासाठी सीईटी सेल व प्राधिकरणाकडून गतवर्षी झालेल्या १२२८ प्रवेशाची चाचपणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या मूळ गुणांची माहिती अ‍ॅटमाकडून घेण्यात येणार आहेत. तसेच त्यांनी प्रवेश यंत्रणेला सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. त्यासंदर्भातील अहवाल प्रवेश प्राधिकरणासमोर ठेवण्यात येणार आहे. पडताळणीमध्ये बनावट कागदपत्रे सादर करून प्रवेश घेतले आहेत असे आताच म्हणता येणार नाही. मात्र यावर्षी बनावट प्रवेशाच्या तक्रारीनंतर कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. दोषी सापडणार्‍या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्याबरोबर त्यांचे प्रवेश रद्द करण्याबाबतचा निर्णय प्राधिकरणासमोर ठेवला जाईल. अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी दिली.

जुन्या प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींचा फायदा
प्रवेशातील गैरकारभाराला आळा घालण्यासाठी सीईटीकडून ‘सार’ पोर्टल सुरू केले होते. परंतु सर्व्हरमध्ये आलेल्या समस्येमुळे हे पोर्टल बंद करून जुन्या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. त्याचा गैरफायदा घेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -