घरमुंबईउपक्रमशीलतेला वाव देणार्‍या शिक्षणाची गरज

उपक्रमशीलतेला वाव देणार्‍या शिक्षणाची गरज

Subscribe

शैक्षणिक यश हा एकमेव मापदंड न मानता उपक्रमशीलतेला वाव देणार्‍या शिक्षणाची गरज आहे. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातून उपक्रमशील विद्यार्थी घडतील असा विश्वास राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातर्फे शाळांना अस्थायी संलग्नतेच्या प्रमाणपत्रांचे वितरण राज्यपालांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री आशीष शेलार, ज्येष्ठ संगणक शास्रज्ञ डॉ. विजय भटकर, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. सुनील मगर उपस्थित होते.

मातृभाषेतून देण्यात येणारे शिक्षण अधिक शाश्वत असते, असे सांगून राज्यपालांनी सरकारने मराठीतून शिक्षण देणारे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (एमआयईबी) स्थापन करुन एक अनोखे पाऊल उचलल्याचे स्पष्ट केले. राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात या मंडळाच्या शाळा सुरू करुन आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन देणारे शिक्षण मराठीतून देण्याचा निर्णय शैक्षणिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी शिक्षणमंत्री शेलार म्हणाले की, मातृभाषेतून शिक्षण देणारे हे बहुदा एकमेव आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ असावे. डॉ. विजय भटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. काकोडकर या नामवंत शास्रज्ञांचा या मंडळाच्या रचनेमध्ये महत्त्वपूर्ण सहभाग राहिला असून देशातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञांचे मार्गदर्शन मंडळाला मिळत आहे.

- Advertisement -

प्रास्ताविक डॉ. मगर यांनी केले. प्रारंभी मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेणारी चित्रफीत दाखविण्यात आली. 81 शाळांच्या मुख्याध्यापकांना राज्यपाल राव यांच्या हस्ते संलग्नतेचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले

यंदा 68 शाळांना संलग्नता
मंडळाशी संलग्नतेसाठी 4 हजार 132 शाळांनी अर्ज केला आहे. मंडळाशी गतवर्षी 13 आणि यावर्षी 68 शाळांना संलग्नता देण्यात आली आहे. यामध्ये सर्वसमावेशकता जपण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या 47 शाळा, 12 खासगी अनुदानित, 8 स्वयंअर्थसहाय्यित आणि एक नगरपालिकेच्या शाळेतून या मंडळाचे शिक्षण देण्यास सुरूवात झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -