घरमुंबई१४ नोव्हेंबर २०१८ जागतिक मधुमेह दिन

१४ नोव्हेंबर २०१८ जागतिक मधुमेह दिन

Subscribe

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये २०१७ साली अंदाजे ७.२ करोड भारतीयांना मधुमेहाची लागण झाली होती. २०२५ पर्यंत हा आकडा दुप्पट म्हणजे १३ करोड होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

भारतीयांच्या आर्थिक उत्पनात वाढ झाली असून हीच वाढ मधुमेह वाढीस कारणीभूत ठरत असल्याची बाब एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. इंडियन कौन्सिल फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनव इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन आणि सार्वजनिक आरोग्य फाउंडेशन ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने २०१७ मधील अहवालात ही बाब नमुद केली आहे. या अहवालानुसार १९९० मध्ये जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, भारतातील प्रति व्यक्ति उत्पन्न ३८० डॉलर (२४८६७ रुपये) होती, २०१६ मध्ये ते ३४० टक्क्यांनी वाढून १६७० डॉलर (१,०९००० रुपये) होते आणि याच कालावधीत मधुमेहाच्या प्रकरणांच्या संख्येत १२३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. आर्थिक सुबत्ता आल्यामुळे शरीराची हालचाल मंदावते आणि उच्च कॅलरी आहाराच्या अतिसेवनामुळे मधुमेह वाढीस लागतो असा निकष याद्वारे मांडला गेला आहे.

हेही वाचा – मधुमेहाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का

- Advertisement -

‘प्रगत राज्यांमध्ये मधुमेह वाढत आहे’

याविषयी अधिक माहिती देताना वाशी येथील स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलचे इंटर्नल मेडिसिन तज्ञ डॉ अक्षय छल्लाणी सांगतात, ” गेल्या दशकभरात मधुमेहामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाले असून यात तामिळनाडू पंजाब आणि कर्नाटक या राज्यांचा पहिला क्रमांक लागतो आणि ही तिन्ही राज्ये आर्थिक दृष्टया विकसित असून तामिळनाडू येथे १ लाख मृत्यूमागे ५२ मृत्यू हे मधुमेहाने तर पंजाब आणि कर्नाटकात अनुक्रमे ४४ आणि ४२ होतात. हेच प्रमाण संपूर्ण देशामध्ये २३ आहे. म्हणजेच प्रगत राज्यांमध्ये मधुमेह वाढीस लागलेला आहे.

हेही वाचा – मुंबई होतंय ‘डायबिटिसचं शहर’, डी वॉर्डमध्ये सर्वाधिक मधुमेही!

- Advertisement -

तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात?

मधुमेह हा आजार फक्त श्रीमंतांनाच होत असल्याचा समजही खोटा ठरत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. यावर बोलताना मधुमेहविकार तज्ज्ञ डॉ. मधुमती कुबेरन यांनी सांगितले की, ” मधुमेहाला सायलेंट किलर या नावाने वैद्यकीय श्रेत्रात संबोधले जाते कारण यात रक्तातील साखर वाढणे एवढेच जरी व्याधीचे स्वरूप दिसत असले, तरी त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. ही रक्तातील वाढलेली शर्करेची पातळी शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर खूप खोलवर परिणाम करते. वाढलेल्या साखरेचे परिणाम पचन संस्था, रक्तवह संस्था, त्वचा, अस्थी, श्‍वसन संस्था, प्रजनन संस्था या सर्वांवर होतो. ”

हेही वाचा – योग जुळवा आणि रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह पळवा !

‘हे’ आहेत मधुमेहचे लक्षणे 

मधुमेहामुळे अंधुक दिसणे, डोळे दुखणे, जड पडणे अशा दृष्टीशी आणि डोळ्यांशी निगडित तक्रारी असतात. संधिवात, किडनीवर परिणाम होतो म्हणजेच मधुमेहामुळे कमीत कमी शरीरातील १४ अवयवांवर विपरीत परिणाम होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये २०१७ साली अंदाजे ७.२ करोड भारतीयांना मधुमेहाची लागण झाली होती. २०२५ पर्यंत हा आकडा दुप्पट म्हणजे १३ करोड होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जागतिक क्रमवारीत मधुमेहींची सर्वाधिक संख्या असलेल्या देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

‘हे’ आहेत मधुमेहींसाठी प्रतिबंधात्मक उपाय

  • मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी दर सहा महिन्यांनी नेत्रविकारतज्ज्ञांची भेट घ्यावी आणि ठरल्या वेळी भेटीस जाणे चुकवू नये. धूसर किंवा अस्पष्ट दिसणे, सरळ रेषा वरखाली किंवा वाकलेल्या दिसू लागणे, विरोधी रंग किंवा एकूणच रंगांबद्दलची संवेदनशीलता कमी होणे, दूरचे पाहण्यास त्रास होणे, दृष्टीच्या मध्यावर छोटासा पण हळूहळू आकाराने वाढत जाणारा ब्लाइंड स्पॉट तयार होणे अशाप्रकारची डीएमईची कोणत्याही लक्षणांचे सजगपणे निरीक्षण करावे आणि दृष्टीमध्ये थोडाही बदल जाणवल्यास तत्काळ तज्ज्ञांची भेट घ्यावी.
  • डॉक्टरांनी दिलेला सल्ला आणि उपचारांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळावे.
  • मधुमेहाचे व्यवस्थापन परिणामकारकरित्या करण्यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण नियमितपणे तपासत रहावे.
  • तुम्ही धूम्रपान करत असाल तर त्यात खंड पडावा यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि ते सोडण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत.
  • वजन नियंत्रणात ठेवावे आणि समतोल आहार घ्यावा.
  • नियमितपणे व्यायाम करावा व रक्तदाब किंवा कॉलेस्ट्रोलचे वाढणार नाही याची दक्षता घ्यावी.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -