घरनवी मुंबईघणसोलीमधील शाळेतील 16 विद्यार्थी कोरोनाबाधित

घणसोलीमधील शाळेतील 16 विद्यार्थी कोरोनाबाधित

Subscribe

नवी मुंबईमधील घणसोली येथील शेतकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय या शाळेतील 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना स्थानिक कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती एका नागरी अधिकार्‍याने शनिवारी दिली. ते इयत्ता 8 ते 11 वीचे विद्यार्थी आहेत, असे नवी मुंबई महानगरपालिका अधिकार्‍याने सांगितले. एका विद्यार्थ्याचे वडील 9 डिसेंबर रोजी कतारहून परत आले होते.

घणसोली येथील गोठीवली येथे आपल्या कुटुंबासह राहणार्‍या या व्यक्तीची कोविड 19 संसर्गाची चाचणी निगेटिव्ह आली होती. जेव्हा त्याच्या कुटुंबातील सदस्यांची चाचणी घेण्यात आली तेव्हा त्यांचा मुलगा तसेच शाळेतील इयत्ता 11 वीच्या विद्यार्थ्याला कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले, असेही ते म्हणाले. त्यानंतर, शेतकरी शिक्षण संस्थेच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. आतापर्यंत 16 विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

- Advertisement -

आतापर्यंत, गेल्या तीन दिवसांत शाळेतील 811 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. शनिवारी इतर 600 विद्यार्थ्यांवर हा अभ्यास केला जाईल, असे अधिकार्‍याने सांगितले.

दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिकेने याची गांभिर्याने दखल घेत माहिती दिली की, सर्व कोविड लक्षणे विरहित मुलांना वाशी येथील महापालिकेच्या सिडको कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. या पॉझिटिव्ह आलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्यांची तसेच त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचीही कोविड टेस्टींग करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उर्वरित मुलांची व त्यांच्या कुटुंबियांची घरी जाऊन टेस्टींग करण्यात येत आहे. मागील दोन दिवसांप्रमाणेच शनिवारीही त्या शाळेतील विद्यार्थ्यांची कोविड टेस्टींग करण्यात आली असून कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेची अंमलबजावणी करत शाळा व शाळेभोवतालच्या परिसराचे निर्जंतुुकीकरण करण्यात आलेले आहे.

- Advertisement -

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार ही शाळा 18 ते 26 डिसोंबर 2021 या 7 दिवसांच्या काळात बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले असून 27 डिसेंबर रोजी शाळा सुरू करण्यापूर्वी कोविड प्रतिबंधात्मक उपायोजनांची खातरजमा करण्याचे आदेशही संस्थेला देण्यात आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व शाळांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत संपूर्ण दक्षता घ्यावी, असे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देशानुसार शिक्षण विभागाने जारी केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -