घरमुंबईकॅण्टीन, सांस्कृतिक कार्यक्रम खर्चाची विद्यार्थ्यांकडून वसुली!

कॅण्टीन, सांस्कृतिक कार्यक्रम खर्चाची विद्यार्थ्यांकडून वसुली!

Subscribe

बोरिवलीच्या आदित्य आर्किटेक्चर कॉलेजचा प्रताप

मुंबईसह राज्यातील कॉलेजांमध्ये फी वाढीचा मुद्दा गाजत असताना बोरिवलीच्या एका आर्किटेक्चर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून कॅण्टीनसाठी ५ हजार रुपये तर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तब्बल ११ हजार रुपये फी आकारल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी समोर आला.

या अतिरिक्त फी बरोबरच विद्यार्थ्यांना सोयीसुविधांपासून वंचित ठेवण्यात येत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या मतदारसंघात या सर्व प्रकार होत असल्याने या प्रकरणी युवा सेनेने पुन्हा एकदा तावडेंना लक्ष्य केले असून शुक्रवारी कॉलेज प्रशासनाविरोधात मोर्चा काढून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

बोरिवली येथील आदित्य आर्किटेक्चर कॉलेजांमधील विद्यार्थी सोयीसुविधांपासून वंचित सोयीसुविधांसाठी अतिरिक्त शुल्क आकारूनही एसी, लिफ्ट यांसारख्या सोयीपासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवणे, पुरेसे शिक्षक उपलब्ध नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून युवा सेनेकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत युवा सेनेने शुक्रवारी याठिकाणी आंदोलन करीत प्रशासनाला धारेवर धरले. युवासेनेच्या सदस्यांनी विद्यार्थी पालकांना सोबत घेऊन कॉलेजपुढे आंदोलन केले. यावेळी युवा सेना कार्यकारणी सदस्य साईनाथ दुर्गे, मुंबई विद्यापीठ सदस्य सुप्रिया कारंडे, शीतल शेठ, निखिल जाधव, शशिकांत झोरे उपस्थित होते. युवा सेनेच्या सदस्यांनी भेट घेतल्यानंतर कॉलेज व्यवस्थापनाने चूक मान्य करत आपण लवकरच विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवू असे आश्वासन दिले आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी युवा सेना नेहमी अग्रेसर असेल व संस्थाचालकांचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया युवा सेना सदस्य साईनाथ दुर्गे यांनी दिली.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या मतदारसंघातच असा प्रकार घडत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करुनही कॉलेज प्रशासन कोणतीही गंभीर दखल घेत नसल्याने आज आम्ही आंदोलन केले आहे. लवकरात लवकर हे प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वास आम्हाला दिले आहे. त्यानंतरही जर प्रश्न नाही सोडविले, तर येत्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल.  – साईनाथ दुर्गे, युवा सेना कार्यकारणी सदस्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -