घरमुंबईअकरावी ऑनलाईन प्रवेशसाठी अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख

अकरावी ऑनलाईन प्रवेशसाठी अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख

Subscribe

सर्वसाधारण गुणवत्ता यादीनंतर अर्जातील चुका दुरुस्त करण्यासाठी संधी देखील दिली जाणार

अकरावी ऑनलाईन प्रवेशसाठी अर्ज करण्यासाठी सोमवारी २३ ऑगस्ट ही शेवटची तारीख देण्यात आली असून उद्या रात्री ११ वाजेर्यंत विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशाठी अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे. आतापर्यंत मुंबईसह पुणे,नाशिक आणि अमरावतीमधून  २ लाख ७२ हजार ६४२ विद्यार्थ्यांनी अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज केला आहे. (23 august is the last date to apply for 11th online admission)

अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी २३-२४ ऑगस्ट दरम्यान जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वसाधारण गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतील स्थान कळणार आहे. त्याचप्रमाणे सर्वसाधारण गुणवत्ता यादीनंतर अर्जातील चुका दुरुस्त करण्यासाठी संधी देखील दिली जाणार आहे.
त्यानंतर २७ ऑगस्ट रोजी अकरावी प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

यंदा दहावीचा निकाल हा ९९.९५ टक्के लागला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी CET परीक्षांची तयारी करण्यास सुरुवात केली मात्र सीईटी परीक्षांवर मोठा गोंधळ उडाला होता. सीईटी परीक्षा न घेता दहावीच्या गुणांवर अकरावी प्रवेश प्रक्रिया करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकार आणि शिक्षण विभागाकडून घेण्यात आला. त्यामुळे आता होणारी अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही दहावीच्या गुणांवर आधारित आहे.


हेही वाचा – बालसंगोपन निधीसाठी अजित पवार साथ देत नाहीत; यशोमती ठाकूर यांची थोरातांकडे तक्रार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -