घरमुंबईCorona: ठाण्यात आरोपीच्या संपर्कात आल्याने २३ पोलीस क्वारंटाईन

Corona: ठाण्यात आरोपीच्या संपर्कात आल्याने २३ पोलीस क्वारंटाईन

Subscribe

ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आलेलं हे तिसरे पोलीस ठाणे आहे

कोरोनाची लागण झालेल्या आरोपीच्या संपर्कात आल्याने पोलीस ठाण्यातील २३ पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी स्वतःला पोलीस ठाण्यातच क्वारंटाईन करून घेतले आहे. तसेच, ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आलेलं हे तिसरे पोलीस ठाणे आहे.

ठाण्यातील सिव्हिल इंजिनियर अनंत करमुसे यांच्यावर मागील आठवड्यात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यात झालेल्या मारहाण प्रकरणी ठाण्यातील एका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली होती. अटक करण्यात आलेले पाचही जण जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आहेत. अटक करण्यात आलेल्या पाच जणांपैकी २ जणांना कोरोनाची लक्षण दिसून आल्याने दोघांना कासारवडवली येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर इतर तिघांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान या आरोपींच्या संपर्कात पोलीस ठाण्यातील काही अधिकारी आणि कर्मचारी आल्यामुळे एकूण २३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तसेच त्यापैकी १३ कोरोना संशयित पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना क्वारंटाईन करण्यात आले असून १० जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली.

या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी पोलीस ठाण्यातील त्यांच्या कक्षात स्वतःला क्वारंटाईन करून घेतले असून ते आपल्या कुटुंबियांशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्कात आहे. तसेच पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील ते फोनच्या माध्यमातून सूचना देत आहेत. ठाणे पोलिसांनी स्वतःची काळजी घेऊन काम करावे, चेहऱ्याला मास्क लावावे, सॅनिटायझरचा वापर करावा, तसेच तक्रारदार व इतरांच्या थेट संपर्कात न येता सुरक्षित अंतर ठेवावे अशा सूचना ठाणे पोलिसांना देण्यात येत आहे.


मालेगाव @ 39; मुंबईहून नाशिकला आलेला युवक पॉझिटिव्ह
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -