घरCORONA UPDATEलग्नासाठी लॉकडाऊनमध्येही रात्री उघडायला लावलं कोर्ट!

लग्नासाठी लॉकडाऊनमध्येही रात्री उघडायला लावलं कोर्ट!

Subscribe

ग्नाचे विधी सुरू असतानाच लॉकडाऊन जाहीर झाला.

मॅक्सिकोची मुलगी आणि हरियाणाचा मुलगा यांच्यामध्ये ऑनलाईन मैत्री झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नासाठी मुलगी भारतातही आली पण लग्नाचे सगळे विधी पुर्ण होण्याआधीच देशात लॉकडाऊन जाहीर झाला. २४ एप्रिलला त्या मुलीला आपल्या आईसोबत परत आपल्या देशात जायचं होतं. यासाठी रात्री ८ वाजता कोर्ट उघडण्यात आलं आणि त्यांच लग्न लावून देण्यात आलं. हे अनोखं लग्न हरियाणाच्या रोहतकमध्ये झालं आहे.

- Advertisement -

रोहतकच्या सुरज कॉलनीमध्ये राहणारे निरज कश्यप यांची मॅक्सिकोला राहणाऱ्या जोहेरी ओलिवेरोस क्रूज बरोबर स्पॅनिश भाषेचा कोर्स करताना मैत्री झाली. निरजने या आधी हॉटेल मॅनेजमेंटचाही कोर्स केला होता. त्यानंतर त्याने ऑनलाईन स्पँनिश भाषेसाठी अडमिशन घेतली. २०१७ ला तो मॅक्सिकोलाही जाऊन आला. २०१८मध्ये जोहेरी आपल्या आईबरोबर टुरिस्ट व्हिजा घेऊन भारतातही येऊन गेली.

त्यावेळी निरंजनच्या वाढदिवसादिवशी साखरपुडा करण्यात आला. मात्र लग्न करण्यासाठी नागरिकत्व ही अडचण होती त्यामुळे जिल्हा कार्यालयात यासाठी अँप्लिकेशन देण्यात आले. लॉकडाऊनच्या आधी लग्नात कोणते विघ्न येऊ नयेत म्हणून पण लग्नाचे विधी सुरू असतानाच लॉकडाऊन जाहीर झाला. जिल्हा कार्यालयाला हे समजताच त्यांनी रात्री आठ वाजता कोर्ट उघडलं आणि लग्न लावून दिलं.

- Advertisement -

२४ एप्रिलला मुलीला आपल्या आईबरोबर घरी परत जायचं होतं. पण आता ५ मे ची विमानाची तिकीटं काढण्यात आली आहेत.


हे ही वाचा – आली लहर केला कहर! गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी त्याने तोडला लॉकडाऊन आणि…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -