घरताज्या घडामोडीमालेगाव @ 39; मुंबईहून नाशिकला आलेला युवक पॉझिटिव्ह

मालेगाव @ 39; मुंबईहून नाशिकला आलेला युवक पॉझिटिव्ह

Subscribe

लॉकडाऊन वाढवण्यात आलेले असतानाही नाशिकमध्ये दिवसेंदिवस पॉझिटिव्ह व संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हा रुग्णालयास बुधवारी (दि.15) रुग्णांचे रिपोर्ट मिळाले असता एक 24 वर्षीय रुग्ण व मालेगावातील 4 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आता नाशिक शहरात 4, मालेेगावात 39, जिल्ह्यात 3 असे एकूण 46 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. पॉझिटिव्ह आलेला युवक मुंबईहून नाशिकमध्ये आला असून त्याच्यावर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी देशभर दुसऱ्यांदा लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. तरीही, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. बागलाण तालुक्यातील नामपूर रुग्णालयातील डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने नामपूर रुग्णालय सील केले आहे. मालेगावात सर्वाधिक 37 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या चार तुकड्या बंदोबस्तासाठी मालेगावात आल्या आहेत.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयास बुधवारी 23 रुग्णांचे रिपोर्ट मिळाले असता 5 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. एक रुग्ण नाशिक – पुणे महामार्गावरील समाजकल्याण कार्यालयाच्या परिसरातील आहे. तसेच तो मुंबईहून नाशकात आला आहे. शहरात  चौथा रुग्ण आढळून आल्याने नाशिककरांमध्ये भितीचे निर्माण झाले आहे. माळेगावचे 22 रिपोर्ट जिल्हा रुग्णालयास मिळाले असून 18 रिपोर्ट निगेटिव्ह व 4 पॉझिटिव्ह आले आहेत. नागरिकांनी सामाजिक अंतर ठेवावे, घराबाहेर पडू नये, असे आवाहन कोरोना जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले आहे.

मालेगावचे नवीन रुग्ण संपर्कातील

मालेगावातील पॉझिटिव्ह 4 रुग्ण हे कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक आहेत. त्यामध्ये दोन महिला व दोन पुरुष आहेत. 25 वर्षीय पुरुष व 26 वर्षीय महिला मोमीनपुरा, 26 वर्षीय महिला नायपुरा व 40 वर्षीय मालेगावातील आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -