घरमुंबईपोलीस बंदोबस्ताचे ८ लाख ३३ हजार थकवले

पोलीस बंदोबस्ताचे ८ लाख ३३ हजार थकवले

Subscribe

अंबरनाथ पालिकेला टेन्शन

अंबरनाथ शहरातील विविध विकासाआड येणारी अतिक्रमणे हटवणे, अवैध बांधकामे, इतर वेळोवेळी मोर्चे आंदोलने आदी सुरक्षिततेकरता अंबरनाथ आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडून पुरविण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तापोटी अंबरनाथ नगरपालिकेकडे 8 लाख 33 हजार 146 रुपये बाकी असल्याचे एका माहिती अधिकारात उघड झाले आहे.

शासकीय माहिती अधिकारी तथा सहा.पोलीस आयुक्त अंबरनाथ यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते वामन उगले यांनी अंबरनाथ नगरपालिका कार्यालयाला अतिक्रमण आणि इतर बंदोबस्तासाठी पुरविलेल्या सुरक्षेबाबत माहिती मागितली होती. त्यानुसार 2015 व 2016 सालची माहिती अंबरनाथ पोलीस ठाणे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर उपलब्ध नाही. सन 2016 ते 2018 या कालावधीत अतिक्रमण बंदोबस्तासाठी नगरपालिकेने मागणी केलेल्या पत्राच्या साक्षांकित प्रतीनुसार अंबरनाथ पोलीस स्टेशनकडून 2015 मध्ये 3 वेळा, 2016 मध्ये 9 वेळा, 2017 मध्ये 1 वेळा, 2018 मध्ये 5 वेळा, सन 2019 मध्ये 2 वेळा पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे.

- Advertisement -

तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडून 2015 मध्ये 3 वेळा, 2016 मध्ये 4 वेळा, 2017 मध्ये 3 वेळा, 2018 मध्ये 1 वेळा बंंदोबस्त देेणंयात आला होता. यासंदर्भात अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -