घरमुंबईCrime ब्रँचच्या 86 अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Crime ब्रँचच्या 86 अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Subscribe

मुंबई पोलीस अधिकार्‍यांची मोठ्या प्रमाणात बदली

मुंबई क्राईम ब्रांचमधून सचिन वाझेंना निलंबित करण्यात आले आहे. यानंतर क्राईम ब्रांचमधील जवळपास ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. क्राईम ब्रांचमधील काही अधिकारी सचिन वाझे प्रकरणामुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. यामध्ये चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या रियजुद्दीन काझी, सुनील माने आणि प्रकाश होवाळ यांचीही बदली करण्यात आली आहे. सचिन वाझे यांच्यासह काम करत असलेले अधिकाऱ्यांच्या एनआयएकडून चौकशी सुरु आहे. सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली असताना मंगळवारी रात्री मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या तब्बल ६५ अधिकारी आणि पोलीस ठाण्याच्या इतर २१ अशा ८६ अधिकार्‍यांची बदली करण्यात आली आहे.

बदली केलेल्या अधिकार्‍यांमध्ये मुंबई पोलिसांच्या गुप्तचर खात्यातील सचिन वाझेचा सहकारी एपीआय रियाझ काझी यांचाही समावेश आहे. त्यांची गुन्हे शाखेतून सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. गुप्तचर खात्याचे एपीआय प्रकाश होवाळ यांना मलबार हिल पोलीस ठाणे तर दहिसर क्राईम ब्रांचचे सुनील माने यांची मुलुंड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -