घरमुंबईमुंबईतील ८८६ शाळाबाह्य विद्यार्थी पुन्हा शाळेत

मुंबईतील ८८६ शाळाबाह्य विद्यार्थी पुन्हा शाळेत

Subscribe

मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये २६४ तर शिक्षण उपसंचालक कार्यालयाशी संलग्न असलेल्या शाळांमध्ये ६२२ शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेमध्ये आणण्यात यश आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी शालेय शिक्षण विभाग व आणि मुंबई महापालिकेच्या शालेय शिक्षण विभागाने कंबर कसली आहे.

कोरोनामुळे शाळाबाह्य झालेल्या मुलांना पुन्हा शाळेत आणण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. शालेय शिक्षण विभाग व मुंबई महापालिकेने राबवलेल्या मोहीमेंतर्गत तब्बल ८८६ विद्यार्थी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये २६४ तर शिक्षण उपसंचालक कार्यालयाशी संलग्न असलेल्या शाळांमध्ये ६२२ शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेमध्ये आणण्यात यश आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी शालेय शिक्षण विभाग व आणि मुंबई महापालिकेच्या शालेय शिक्षण विभागाने कंबर कसली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांच्या नोकर्‍या सुटल्याने आणि ऑनलाईन शिक्षण शक्य नसल्याने अनेक विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी मुंबई महापालिकेचे शालेय शिक्षण विभाग आणि मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत सर्व शिक्षा अभियानांतर्गत स्वतंत्रपणे मोहीम राबवली आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे राबवण्यात आलेल्या मोहीमेंतर्गत पालिकेच्या १२ शहर साधन केंद्रामधून तब्बल २६४ शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्यात बालरक्षकांना यश आले. यामध्ये पहिली ते चौथीचे १९७ शाळाबाह्य विद्यार्थी तर, पाचवी ते आठवीचे ६७ विद्यार्थी सापडले. चौथीपर्यंतच्या १९७ विद्यार्थ्यांना जवळच्या ९० शाळांमध्ये दाखल केले तर पाचवी ते आठवीच्या ६७ विद्यार्थ्यांना ३१ शाळांमध्ये दाखल केले असल्याची माहिती मुंबई महापालिका शिक्षण विभागाचे जिल्हा समन्वयक अशोक लोखंडे यांनी दिली.

- Advertisement -

उपसंचालक कार्यालयांतर्गत येणार्‍या शाळांमध्ये राबवण्यात आलेल्या मोहीमेंतर्गत ६२२ विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यात यश आले. यामध्ये कोरोना काळामध्ये पालकांकडे मोबाईल नसल्याने शिक्षणापासून वंचित राहिलेल्या ९३ विद्यार्थ्यांनाही पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले. यातील २०४ विद्यार्थ्यांना शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या शाळेतून विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आलेल्या मोहीमेंतर्गत निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेकडे वळविण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. पालिका शिक्षण विभाग आणि शिक्षण उपसंचालक कार्यालय या दोन्हीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मोहिमेचे हे यश असल्याचे बोलले जात आहे.

कोरोनामध्ये १५६१ विद्यार्थ्यांचे स्थलांतर

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शोधताना मुंबई उपसंचालक कार्यालयामार्फत स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा शाळेत आणण्यात आले. या मोहीमेंतर्गत १५६१ विद्यार्थ्यांचे स्थलांतर झाल्याचे उघडकीस आले. यापैकी ९७४ विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत प्रवेशित करून घेण्यात आले आहे. मुंबई उपसंचालक कार्यालयाअंतर्गत मुंबईसह पालघर, ठाणे, नवीमुंबई, रायगड परिसरातील शाळांचाही समावेश आहे.

मुंबई महापालिकेतर्फे चौथ्या शनिवारी शिक्षकांच्या माध्यमातून विशेष मोहिम राबवली जाते. शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी पालिकेने शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे आम्हाला त्यात चांगले यश मिळते. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पालिकेकडून सर्व शिक्षणाच्या सुविधा पुरवल्या जातात.
– अशोक लोखंडे, जिल्हा समन्वयक मुंबई महापालिका शिक्षण विभाग
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -