घरमुंबईAaditya Thackeray : रडारड केली तरी 'बापचोर, गद्दार' हा टॅग पुसला जाणार...

Aaditya Thackeray : रडारड केली तरी ‘बापचोर, गद्दार’ हा टॅग पुसला जाणार नाही- आदित्य ठाकरे

Subscribe

सभेला उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर सडकून टीका केली. आणि सध्याचं सरकार केवळ इतिहासात काय झालं त्यात अडकून पडली आहे. आपण भविष्यावर काम करणारी लोकं आहोत, पण सध्याचे सरकारकडून सगळे उद्योग गुजराथ मध्ये पाठवले जात आहेत. यांच्या फक्त टॅगलाइन बदलत असतात परिस्थिती तीच राहते. 'अब की बार 400 पार आणि वैगरे वैगरे. फक्त निवडणुका आल्या की, घोषणा बदलतात कामं होत नाहीत. असं म्हणत सरकारला आदित्य ठाकरे यांनी धारेवर धरलं.

मुंबई : युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या “महा निष्ठा, महा न्याय, महाराष्ट्राच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात झंजावात सुरू आहे. आज राजधानी मुंबईत लालबाग विभाग क्रमांक 11 येथे आदित्य ठाकरे यांची तोफ धडाडली. या सभेला शिवसैनिक आणि मुंबईकरांनी मोठी गर्दी केली. संपूर्ण लालबाग शिवसैनिकांच्या घोषणांनी दणाणून गेला होता. (Aaditya Thackeray Even if radared the tag Baap Chor Gaddar will not be erased  Aditya Thackeray)

सभेला उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर सडकून टीका केली. आणि सध्याचं सरकार केवळ इतिहासात काय झालं त्यात अडकून पडली आहे. आपण भविष्यावर काम करणारी लोकं आहोत, पण सध्याचे सरकारकडून सगळे उद्योग गुजराथ मध्ये पाठवले जात आहेत. यांच्या फक्त टॅगलाइन बदलत असतात परिस्थिती तीच राहते. ‘अब की बार 400 पार आणि वैगरे वैगरे. फक्त निवडणुका आल्या की, घोषणा बदलतात कामं होत नाहीत. असं म्हणत सरकारला आदित्य ठाकरे यांनी धारेवर धरलं.

- Advertisement -

शिवसेना, शिवसैनिक आणि जनतेशी गद्दारी करणाऱ्यांना आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणा दरम्यान ठणकावून सांगितले की गद्दारांनी आता सुद्धा काहीतरी रडारड केली. पण तुमच्यावर असलेला गद्दार आणि बापचोर ही टॅगलाइन कधीच पुसली जाणार नाही. प्रकल्प गुजरातला पळवतायत, मुंबईच्या रक्तारक्तात क्रिकेट असताना वर्ल्डकप फायनल कुठे झाली तर गुजराथला. जर ती मॅच इथे मुंबईत झाली असती तर आज निर्णय वेगळा असता. पण महाराष्ट्राच्या विकासाशी देणं घेणं नाही. सगळं गुजरातला पाठवलं जातंय, पण याला आमदार बनवू याला खासदार बनवू पण तरुणांच काय, त्यांच्या रोजगाराच काय? असं म्हणत महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये नेले जातायत त्यावर आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला.

ईडी, सीबीआय येतील, पण घाबरायचं नाही

देशभरात आणि राज्यभरात सरकारकडून शिवसैनिकांवर केंद्रीय आस्थापनांच्या दबावतंत्रावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना आवाहन करताना म्हटलं की आज या गद्दारांच्या विरोधात किशोरी पेडणेकर, राजन साळवी, सूरज चव्हाण लढत आहेत. संजय राऊत तर जेलमध्ये जाऊन आले, आता तर ते कोणाला घाबरत नाहीयेत. दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय संस्थांचा वापर केला जातोय. उद्या तुमच्या घरीसुद्धा त्यांचे ED, CBI घेऊन येतील. पण आपण घाबरायच नाही. ‘आपण एक होऊन मुंबईकर होऊन लढायच आहे असं ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Congress : मोदी पुन्हा सत्तेत आल्यास तुरुंगात जावे लागेल! रमेश चेन्नीथला यांची भीती

दाग अच्छे है, वॉशिंग पावडर भाजपा

आजच्या सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपाच्या बोटचेपी धोरणावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, मला तर भाजपाच्या कार्यकर्त्यां विषयी वाईट वाटतेय. कारण आता ज्या काही नेत्यांना पद दिले आहेत, त्यातले अनेक बाहेरचे आहेत. मी तर राहुल गांधी यांना सल्ला देईन की, तुम्हाला पंतप्रधान बनायचं असेल तर, तुम्ही भाजपामध्ये जा. कारण तिथे सर्व काँग्रेसवालेच आहेत. आता भाजपचा नारा बदलला आहे ‘दाग अच्छे है’, वाशिंग पावडर भाजपा’ अशी झालीये. कारण जेवढे गद्दार भ्रष्टाचारी आहेत, ते सर्व भाजापामध्ये आहेत. असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा : Mumbai News सखोल स्‍वच्‍छता मोहिमेमुळे प्रदूषणासह साथीच्या आजारात घट- चहल

महिलेवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे

राज्यातील मंत्रिमंडळाच्या कारभारावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की ‘या मंत्रिमंडळात एक असा मंत्री आहे ज्याने एका महिला खासदाराला शिवीगाळ केली होती. त्याला प्रमोशन देण्यात आलं आहे. आमच्या मंत्रिमंडळात एका गद्दरावर गंभीर आरोप झाले होते, त्याला आम्ही लगेच हकालवून लावलं, पण जेव्हा या गद्दरांचे सरकार आलं तेव्हा त्याला लगेच मंत्रिपद दिले. बिल्कीस बानो यांच्या रेपिस्टचा सत्कार करण्यात आला. हे आपलं हिंदुत्व नव्हे. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला अशी शिकवण दिली नाहीये. अत्याचार झालेल्या महिलेची जात धर्म आपण कधी बघत नाही. महिलेवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांना फासावर लटकवले पाहिजे . अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -