घरक्राइमAbhishek Ghosalkar : मॉरिसची शेवटची रील आणि 10 दिवसात घोसाळकरांची हत्या, नेमका...

Abhishek Ghosalkar : मॉरिसची शेवटची रील आणि 10 दिवसात घोसाळकरांची हत्या, नेमका संबंध काय?

Subscribe

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि दहिसरचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल गुरुवारी (ता. 08 फेब्रुवारी) रात्री हत्या करण्यात आले. दहिसर-बोरिवली येथील सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख असलेले मॉरिस नोरोन्हा यांनी फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच घोसाळकरांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. पण धक्कादायक बाब मॉरिसने यानंतर गोळ्या झाडून आत्महत्या केली. पण मॉरिसने फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच घोसाळकरांवर गोळ्या का झाडल्या? याबाबत आता प्रश्न निर्माण झाला आहे. तर मॉरिस हा सोशल मीडियावर सक्रीय होता. त्याचमुळे त्याने या घटनेचेही चित्रीकरण केले असावे, असे सांगण्यात येत आहे. (Abhishek Ghosalkar : What is the connection between Morris’ last reel and Ghosalkar’s murder in 10 days?)

हेही वाचा… Dahisar Firing : आपल्याकडे ‘लॉ’ आहे, पण…; राज ठाकरेंचा व्हिडीओ शेअर करत मनसेचे सूचक ट्वीट

- Advertisement -

मॉरिस नोऱ्होना हा सोशल मीडियावर सक्रीय होता. फेसबुक लाइव्ह करून संवाद साधणे, रील बनवणे हे तो नेहमीच करायचा. अगदी 10 दिवसांपूर्वीच त्याने एक रील बनवले होते. ज्यात “शेर को पकडने के लिए शिकारी चाहिये…” अशा स्वरुपाचे गाणे पार्श्वभूमीवर वाजत आहे. 29 जानेवारी रोजी त्याने ही शेवटची रील पोस्ट केली होती. ज्यामुळे त्या रीलचा या घटनेशी काही संबंध आहे का? असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. कालच्या घटनेतही मॉरिसने माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाइव्ह सुरू करून त्यांच्यावर गोळीबार केला. त्यामुळे या हत्येचा कट आधीच रचण्यात आला होता. असे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मॉरिस आणि अभिषेक यांच्यात अनेक वर्षांपासून मतभेद होते. मात्र, या दोघांमधील वाद मिटल्याचे सांगितले जात होते. त्यातच गोळीबाराच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी हे दोघे एकत्र दिसले. मॉरिसने गुरुवारी आपल्या कार्यालयाबाहेर साडी वितरण कार्यक्रम ठेवला. घोसाळकर देखील तिथे पोहोचले. त्या दोघांनी गळाभेट घेतली. वाद मिटवून नेते एकत्र आल्याने कार्यकर्त्यांनी देखील आनंद व्यक्त केला. आपण एकत्र आल्याचे नागरिकांना समजावे म्हणून मॉरिसने साडेसातच्या सुमारास फेसबुक लाइव्हसाठी अभिषेक यांना कार्यालयात नेले. लाइव्हमध्ये देखील चांगली कामं करण्यासाठी आम्ही मतभेद बाजूला करून एकत्र आल्याचे दोघांनी सांगितले. हेच आता बाहेर जाऊन कार्यकर्त्यांसमोर सांगूया, गॉड ब्लेस यू, असे म्हणत अभिषेक घोसाळकर उठले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. यातून सावरायचा वेळही त्यांना मिळाला नाही.

- Advertisement -

फेसबुक लाइव्हमध्ये दोघे काय बोलले?

चार मिनिटांच्या या फेसबुक लाइव्हमध्ये मॉरिस सुरुवातीला गॉड ब्लेस यू म्हणत घोसाळकरांना बोलण्यास सांगतो. त्यावर घोसाळकर आज मॉरिस भाईंसोबत लाइव्ह येण्याची संधी मिळाली, हे पाहून अनेक जण सरप्राइज होतील असे म्हणतात. घोसाळकर बोलत असतानाच मॉरिसमध्ये येतो आणि आज बहोत लोग सरप्राइज होंगे, असे म्हणतो. काही गोष्टी एकतेसाठी, चांगले काम करण्यासाठी होतात, असे बोलून पुन्हा घोसाळकरांना दोन शब्द बोलण्याचा आग्रह करतो. घोसाळकर यांनी बोलताना, एक चांगली दिशा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. साडी, रेशन वाटण्यासोबतच मुंबई ते नाशिक बस प्रवास सुरू करणार आहोत. नवीन संकल्प घेत एकत्र काम करणार आहोत. आमच्यात, कार्यकर्त्यांमध्ये काही गैरसमज होते. मात्र आता एकत्र येत काम करणार असे ते अभिषेक म्हणाले. बोलणे झाल्यानंतर उठून जात असतानाच त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या गेल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -