घरमुंबईमरिन ड्राइव्हच्या रस्त्यांवरील अपघातांवर रामबाण उपाय

मरिन ड्राइव्हच्या रस्त्यांवरील अपघातांवर रामबाण उपाय

Subscribe

‘मरिन ड्राइव्ह’लगत असणाऱ्या रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांना थांबविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी एक नवीन उपाय शोधून काढला आहे. हा रामबाण उपाय रस्ता दूभाजकांवर अवलंबला जाणार आहे. रस्ता दूभाजकांवर दोन ते तीन फुटांचे लोखंडी रॉड बसविण्याचा निर्णय ‘मुंबई महापालिके’ने घेतला आहे. महापालिकेच्या या निर्णयाला ‘मुंबई हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटी’ने(एमएचसीसी) मान्यता दिली आहे.

३.६ किलोमीटरवर लोखंडी रॉड

मुंबईची शान म्हणून ओळखले जाणारे ‘मरिन ड्राइव्ह’ पर्यटकांची नेहमीच आवडीची जागा मानली जाते. तरुणांनाही या जागेने भुरळ पाडले आहे. समुद्राच्या उथळ लाटांचे सौदर्य बघण्यासाठी इथे दररोज लाखो लोकांची गर्दी जमते. परंतु, ‘मरिन ड्राइव्ह’ला आलेल्या या लोकांकडून रस्ता ओलांडताला वाहतूकीचे नियम पाळले जात नाही. त्यामुळे ‘मरिन ड्राइव्ह’ रस्त्यावर मोठ्या प्रमाणत अपघात होताना दिसताहेत. या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी एक नवा उपाय शोधूण काढला आहे. तो म्हणजे रस्ता दूभाजकांवर लोखंडी रॉड आखण्यात येणार आहेत. सुमारे ३.६ किलोमीटरच्या रस्ता दूभाजकांवर लोखंडी रॉड बसविण्यात येणार आहेत. या उपाययोजने नंतर ‘मरिन ड्राइव्ह’ रस्त्यावरील अपघातांवर नियंत्रण मिळवता येईल अशी आशा वर्तविली जात आहे.

- Advertisement -

दूभाजकांची उंची वाढविण्यास अखेर ‘हेरिटेज’ची मान्यता

मरिन ड्राइव्ह वरील संरक्षण आणि सौंदर्यप्रदर्शन निमित्ताने नोव्हेंबर २०१७ मध्ये एक मिटींग आयोजित करण्यात आली होती. या मिटींगमध्ये मुंबईचे पोलिस आयुक्त दत्ता पडसीलगीकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता आणि ‘मुंबई हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटी’चे पॅनल चीफ रामनाथ झा उपस्थित होते. या मिटिंग दरम्यान, मरिन ड्राइव्हशी संबंधित बऱ्याच विषयांवर चर्चा करण्यात आली. रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाताना लोक वाहतूक नियमांचे उल्लंघण करतात. लोक मागेपूढे न बघता दूभाजकांवर चढून रस्ता ओलांडतात. बऱ्याचदा दूभाजकांवरुन उडी मारताना मोठे अपघात होतात. त्यामुळे दुभाजकांवर चढून रस्ता ओलांढणे ही एक मोठी समस्या असल्याचे चर्चासत्रात सांगण्यात आले. त्यामुळे या दुभाजकांची उंची वाढविण्याचा प्रस्ताव या चर्चासत्रात पुढे आला. परंतु, या प्रस्तवाला हेरिटेज कमिटीने नकार देऊन, दूभाजकांवर झाडे लावण्याचा उपाय ठरविण्यात आला. परंतु, झाडे जगू न शकल्यामुळे अखेर हेरिटेजने या दुभाजकांची उंची वाढविण्यास मान्यता दिली. या दुभाजकांवर आता लोखंडी रॉड बसविण्यात येणार आहे.

दूभाजकांची उंची वाढविल्यानंतरही समुद्राचे दर्शन घडणार

दूभाजकांची उंची वाढविल्यानंतर ‘मरिन ड्राइव्ह’चे सौंदर्य रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दिसणार नाही, असे ‘मुंबई हेरिटेज कन्झर्वेशन कमिटी’ला वाटत होते. परंतु, या दूभाजकांवर जर लोखंडी रॉड लावले तर समुद्राचे आणि मरिन ड्राइव्हचेही जसेच्या तसे चित्र रस्त्याच्या दुसऱ्या बाजूवरील लोकांना दिसेल. याची पडताळणी करण्यासाठी ‘मुंबई हेरिटेज कन्झर्वेशन कमिटी’चे काही अधिकारी मरिन ड्राइव्हला पाहणीसाठी गेले होते. त्यानंतर या निर्णयाला मान्यता देण्यात आली.

- Advertisement -

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘सध्या रस्ता दूभाजक हे शाधारणत: ३ फूटाचे आहे. या दूभाजकावर आणखीन २ ते २.५ फूटाचे लोखंडी रॉड बसविण्यात येणार आहे. रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडील दृश्य न दिसण्याची भीती वर्तविली जात होती. परंतु, लोखंडी रॉड बसविल्याने अशी समस्या उद्भवणार नाही. या उपाययोजेमुळे समुद्राचे दृश्यही दिसू शकते.’

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -