घरमुंबईदिव्यात अनधिकृत बांधकामावर कारवाई; २९ हातगाड्या तर ११ बाकड्यांवर हातोडा

दिव्यात अनधिकृत बांधकामावर कारवाई; २९ हातगाड्या तर ११ बाकड्यांवर हातोडा

Subscribe

दिवा प्रभाग समिती अतिक्रमण पथकाने अनाधिकृत बांधाकामावर धडक कारवाई केली.

रस्त्यावर कब्जा करून वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने रस्त्यावरील हातगाड्या, बाकडे आणि अनधिकृत बांधकामावर दिवा प्रभाग समिती अतिक्रमण पथकाने धडक कारवाई केली. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशानंतर २९ हातगाड्या, ११ बाकडे आणि तीन अनधिकृत बांधकामावर हातोडा पडला. दिवा प्रभाग समितीच्या हद्दीत येणाऱ्या कल्याणफाटा नाका परिसरात निर्माण करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर आणि रस्त्यावर अनधिकृत कब्जा करून वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या हातगाड्या आणि बाकड्यांवर कारवाईचे आदेश आयुक्त जयस्वाल यांनी दिल्यानंतर गुरुवारी ही कारवाई करण्यात आली.

अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरफूलले, उपायुक्त मनीष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ. सुनील मोरे यांच्या नेतृत्वाखाली दिवा प्रभाग समिती अतिक्रमण पथकाने धडक कारवाई केली. हॉटेल सुनील बार, करण हॉटेल,  दत्तमंदिराच्या बाजूला असलेले पत्र्याचे तीन शेड, प्लास्टिक आणि बांबूचे ९ शेड, २९ हातगाड्या, लोखंड आणि लाकडाचे ११ बाकडे यांच्यासह अन्य ९३ ठिकाणे तोडू कारवाई केली. यात उमा पार्कच्या मागे आरसीसी स्लॅब, तीन रूममध्ये करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम, खान कंपाउंड समोरच्या हैदराबाद अंडीवालाच्या मागे करण्यात आलेले दोन माजली बांधकाम आदींवर धडक कारवाई करून गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आले. दरम्यान दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त डॉ. सुनील मोरे यांनी हातगाड्या, बाकडे आणि अतिक्रमण बांधकामावर धडक कारवाई सुरुच राहणार असलयाचे सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – डंपरची रेल्वेला धडक; मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -