घरमुंबईडंपरची रेल्वेला धडक; मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत

डंपरची रेल्वेला धडक; मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत

Subscribe

मध्यरेल्वेच्या प्रवाशांना शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा रेल्वे त्रासाला सामोर जावं लागलं. आंबिवली स्थानकाजवळ लेव्हल क्रॉसिंग करत असताना डंपरने रेल्वे गेटला धडक दिल्याने ओव्हरहेड वायरचा विद्युतपुरवठा खंडीत झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. त्यानंतर ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर ही वाहतूक सुरू करण्यात आली. अद्याप मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत झालेली नाहीये. मध्य रेल्वेची वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे.

- Advertisement -

पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. लेव्हल क्रॉसिंग करत असताना एका डंपरची रेल्वेला धडक दिली. यावेळी ओव्हरहेड वायरचा खांबाला धडक बसून विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तातडीने ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम हाती घेत ते दुरुस्त करण्यात आले. या सगळ्याचा परिणाम रेल्वे वाहतूकीवर झाला. तब्बल एक ते दीड तास रेल्वे उशीराने धावत होत्या. त्यामुळे चाकरमान्यांना चांगलेच हाल सहन करावे लागले.

केवळ लोकलवर नाही तर याचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही झाला. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेस, राज्यराणी, पंजाब मेल अशा गाड्या खोळंबल्या. ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी रेल्वेने अर्धा तासाचा ब्लॉक घेतला होता. या दरम्यान ही दुरुस्ती करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -