घरमुंबईमुंबई: लैंगिक अत्याचार प्रकरणात प्रसिद्ध हिंदी टीव्ही अभिनेत्याला अटक!

मुंबई: लैंगिक अत्याचार प्रकरणात प्रसिद्ध हिंदी टीव्ही अभिनेत्याला अटक!

Subscribe

ज्योतिषी महिलेवर प्रियकराने लैगिंक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तिचा प्रियकर आणि हिंदी मालिकांमधला प्रसिद्ध अभिनेता करणसिंग ओबेरॉय याला अटक करण्यात आली आहे.

ज्योतिषी असलेल्या एका ३४ वर्षाच्या महिलेवर लैंगिक अत्याचार करुन तिच्याकडून खंडणीची मागणी करणार्‍या प्रियकराला रविवारी ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. करणसिंग भुपेंद्रसिंग ओबेरॉय (४७) असे या आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. करणसिंग ओबेरॉयने आत्तापर्यंत अनेक हिंदी मालिका आणि जाहिरातींमध्ये काम केलं आहे. ‘जस्सी जैसी कोई नहीं’, या मालिकेत देखील करणने भूमिका निभावली होती. स्वाभिमान, साया, दिशायें, जिंदगी बदल सकता है हादसा, इनसाईड एज, रॉसवेल न्यू मॅक्सिको या मालिकांमध्ये त्याने अभिनय केला आहे. तर टायटन अंताक्षरी आणि द ग्रेट इंडियन कॉमेडी शो या रिअॅलिटी शोचं अँकरिंग देखील करण ओबेरॉयनं केलं आहे.

Actor Karan singh
अभिनेता करणसिंह ओबेरॉय

ज्योतिष महिलेला लुटले

ज्योतिषी महिला आपल्या आई, मावशी आणि तिच्या मुलासोबत सध्या अंधेरी परिसरात राहतात. ज्योतिषी महिला आपल्या घरातून काम करते. ऑगस्ट २०१६ ला तिची ओळख टिंडर या डेटींग अ‍ॅपवरुन करणसिंग याच्याशी झाली होती. या ओळखीचे रुपांतर मैत्री आणि नंतर प्रेमात झाले होते. यावेळी तिने त्याला टाईमपास रिलेशन ठेवण्यास तिला रस नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर ते दोघेही सोशल मीडियावरुन एकमेकांच्या संपर्कात होते. याच दरम्यान त्यांची यमुनानगर परिसरात भेट झाली होती. त्यानंतर तो अधूनमधून तिच्या घरी जात होता. जानेवारी २०१७ रोजी तो तिच्या घरी असताना त्याने तिला नारळपाण्यातून गुंगीचे औषध दिले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. या संबंधाचे त्याने त्याच्या मोबाईलवरुन व्हिडिओ काढले होते. दुसर्‍या दिवशी त्याने तिला घडलेला प्रकार सांगून त्यांच्यातील संबंधाचे व्हिडिओ बनविल्याचे सांगितले. त्यानंतर तिने ते व्हिडिओ डिलीट करण्याची विनंती केली. मात्र तो तिला ब्लॅकमेल करु लागला. व्हिडिओ डिलीट करण्यासाठी तिच्याकडे पैशांसह इतर वस्तूची मागणी करु लागला. सुरुवातीला त्याने तिच्याकडून पोखराज आणि माणिक असे दोन खडे घेतले. हेडफोन, बँकेचे हप्ते भरण्यासाठी पैशांची मागणी करु लागला. त्यानंतर त्याने तिच्याकडून फ्रीजदेखील घेतला.

- Advertisement -

नेहमी तो तिच्याकडे काहीतरी वस्तूंची मागणी करु लागला होता. दुसरीकडे तो तिच्याशी लग्न केल्यानंतर ते व्हिडिओ डिलीट करु, असेही सांगत होता. यावेळी त्याने तिच्यावर एक-दोनदा पुन्हा लैगिंक अत्याचार केला होता. यावेळी त्याने तिला फोन करुन तिचे सर्व सामान, पैसे परत करुन तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. त्यापूर्वी तिने त्याला अडीच लाख रुपये द्यावेत. एका प्रकरणात तो अडकला असून त्याला पैशांची प्रचंड गरज असल्याचे सांगितले. मात्र ऑक्टोबर २०१८ रोजी त्याने तिला तिचे ‘पैसे, सामान परत करणार नाही, व्हिडिओही डिलीट करणार नाही, असे सांगून तिला जे काही करायचे आहे ते करावे’ अशी धमकी दिली होती. या घटनेनंतर तिने ओशिवरा पोलिसांत धाव घेऊन तिथे करणसिंगविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. याप्रकरणी बलात्कार, खंडणीसह अन्य भादंवी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच त्याला रविवारी ओशिवरा पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -