घरक्राइमडॉ. आशा गोयल खून खटल्यात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून...

डॉ. आशा गोयल खून खटल्यात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Subscribe

भारतातील प्रमुख फौजदारी वकिलांपैकी एक असलेले ॲड. उज्ज्वल निकम यांची कॅनेडियन नागरिक डॉक्टर आशा गोयल यांच्या हत्येप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई – भारतातील प्रमुख फौजदारी वकिलांपैकी एक असलेले ॲड. उज्ज्वल निकम यांची कॅनेडियन नागरिक डॉक्टर आशा गोयल यांच्या हत्येप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. गोयल यांची जवळपास दोन दशकांपूर्वी मुंबईत कौटुंबिक मालमत्तेचा वाद मिटवण्याच्या प्रयत्नात असताना हत्या करण्यात आली होती. या महिन्याच्या सुरुवातीला पूर्वीचे वकील अवधूत चिमळकर यांनी राजीनामा दिल्यामुळे ही नियुक्ती करण्यात आली आहे. (Adv. Ujjwal Nikam appointed as special public prosecutor in Dr. Asha Goyal murder case)

हेही वाचा शेअर बाजार गडगडला, दोन दिवसांत १७०० अंकांची घसरण

- Advertisement -

उज्ज्वल निकम या खटल्याचे नेतृत्व करतील आणि त्याची सुनावणी २४ ऑगस्ट रोजी मुंबई सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर होईल. डॉ. आशा गोयल यांच्या खून खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून त्यांच्या नियुक्तीची घोषणा राज्य कायदा व न्याय विभागाने १० ऑगस्ट २०२२ रोजी केली होती. या खटल्याच्या सुनावणीची प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षा होती आणि तिला अनेक वेळा विलंब झाला होता.

निकम यांनी भारतातील सर्वाधिक चर्चित अशा खूनसामूहिक बलात्कार आणि दहशतवादाच्या खटल्यांमध्ये सरकारी पक्षाचे यशस्वीरित्या नेतृत्व केले आहे. यात २००८ च्या मुंबई हल्ल्याच्या खटल्याचाही समावेश आहे. ऑरेंजविलेओंटारियो येथे कॅनेडियन प्रसूतीतज्ञ असलेल्या ६२ वर्षीय डॉ. गोयल यांची ऑगस्ट २००३ मध्ये मुंबईच्या मलबार हिल्स परिसरात त्यांच्या कुटुंबाच्या वडिलोपार्जित घरात भाडोत्री मारेकऱ्यांनी हत्या केली होती. डॉ. गोयल या ४० वर्षांपासून प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या आणि त्या सस्कॅचेवनमध्येही प्रॅक्टिस करत होत्या. त्यांनी कॅनडामध्ये दहा हजारांहून अधिक बाळाच्या ससेक्स डिलिव्हरी त्यांनी केल्या आहेत.

- Advertisement -

भारतातील तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की डॉ. गोयल यांची हत्या झाली तेव्हा त्या आपला भाऊ सुरेश अग्रवाल यांची भेट घेण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. त्यांनी आरोप केला आहे की सुरेशने टोरंटो येथील रहिवासी असलेला आपला भाऊ सुभाष अग्रवाल यांच्या सोबतीने १२ दशलक्ष डॉलर्सच्या वारसा हक्कावरून असलेल्या वादामुळे बहिणीची हत्या करण्याचा कट रचला. त्यानंतर सुरेशचा मृत्यू झालापरंतु कॅनडाचे नागरिक असलेले सुभाष यांच्या विरोधात इंटरपोलने रेड नोटीस जारी करूनही ते टोरंटोमध्ये फरार आहेत. ते भारतात अजूनही वाँटेड आरोपी आहेत. त्यांनी आपल्या बहिणीच्या हत्येशी संबंध असल्याचा इन्कार केला आहे.

मुंबई पोलिसांनी अन्य चार जणांनाही अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील तीन जण- प्रदीप परबपवनकुमार गोएंका आणि मनोहर शिंदे हे अग्रवाल बंधूंचे कर्मचारी होते.

चौथा नरेंद्र गोयल (डॉ. आशा गोयल यांच्याशी कोणताही संबंध नाही) हा सुरेश अग्रवाल यांचा जावई होता. त्यानंतर शिंदे यांचे ही निधन झाले. गोयंका आणि नरेंद्र गोयल यांच्या विरोधात या आठवड्यात न्यायालयासमोर सुनावणी सुरू होईल. दरम्यान परब यांनी पोलिसांसमोर कबुलीजबाब देऊन ते माफीचे साक्षीदार बनले. त्यांचा कबुलीजबाब हा या खटल्याच्या केंद्रस्थानी असून त्यात परब यांनी या प्रकरणातील विविध आरोपींच्या भूमिकांचे निर्घृण तपशीलांसह वर्णन केले आहे आणि सांगितले आहे की डॉ. गोयल यांना मारण्यासाठी त्यांना सुमारे १५० कॅनेडीयन डॉलर मिळणार होते.

उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती ही आमच्या आईसाठी न्यायाच्या १९ वर्षांच्या लढाईतील एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे संजय गोयल आणि रश्मी गोयल म्हणाले. ते डॉ. आशा गोयल आणि डॉ. सदन गोयल यांचे पुत्र व कन्या आहेत. ते म्हणालेभारतातील खटल्याचे नेतृत्व करण्यासाठी याहून अधिक कुशल आणि समर्पित कोणाचीही आम्ही मागणी करू शकत नाही. आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी भारत मदत करत असताना कॅनडाने मात्र कॅनडाची नागरिक असलेल्या आमच्या आईच्या हत्येचा उलगडा करण्यात मदत करणे थांबवले आहे. ही भारताची बाब असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -