घरमहाराष्ट्र'ही' चूक उद्धव ठाकरेंनी केली, मंत्री सत्तारांचे विरोधी पक्षनेते दानवेंना उत्तर

‘ही’ चूक उद्धव ठाकरेंनी केली, मंत्री सत्तारांचे विरोधी पक्षनेते दानवेंना उत्तर

Subscribe

मुंबई – आज विधान परिषदेत पुरवणी मानण्यावर चर्चा सुरू झाली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सिल्लोड येथील सूत गिरणीच्या आनुदानाचा विषय भाषणात काढला. यावर विरोधी पक्षनेत्यांना मधेच थांबवत मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांना उत्तर दिले.

अब्दुल सत्तार काय म्हणाले –

- Advertisement -

यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले ही चूक उद्धव ठाकरेंनी केली. त्यांनी त्यांच्या कॅबीनेटमध्ये याला मंजूरी दिली आहे. याबाबत उद्धव ठाकरेंजींना तुमच्या पक्षप्रमुखांना विचारुन घ्या. मी उत्तर देत नाही. तुम्ही माझे नाव घेतले नसते तर मी बोललो नसतो. तुम्ही माझे नाव घेतले मंत्री म्हणून आणि सिल्लोड म्हणून विरोधी पक्षनेते. यावर मी नाव घेतलेले नाही सभापती महोदय असे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले. यानंतर मंत्री सिल्लोड म्हणून माझे नाव घेतले. सील्लोडला दोन चार मंत्री नाहीत एकच मंत्री आहे सिल्लोडला, असे अब्दुल सत्तार म्हणाले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे स्पष्टीकरण –

मा सभापती महोदय अशा पद्धतीने निधी द्यायला विरोध आहे, असे मी मुळीच म्हटलेले नाही. माझे म्हणणे आहे की शेतकऱ्यांना मदत देताना वेगवेगळे निकष आणि हे निकष शेतकऱ्यांना लागू होत नाहीत कामी निकषांवर बोलत होतो. मी मदतीवर बोललो नाही. आणखी दहा सूत गीरण्या करा आणि त्या सूत गीरण्या  सिल्लोडमध्येच करा त्याला ही मदत द्या  पण शेतकऱ्यासाठी मदत देताना निकष लावले जातात. पण सूत गिरणीचे निकष बाजूला केले जातात. या विषयावर मी बोललो आहे. बाकी विषयावर मी बोललेलो नाही. उलट माझ्या जिल्ह्यात आपल्याला मला आनंद आहे, असे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते दानवेंनी दिले.
Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -