घरमुंबईअजित पवारांच्या दादागिरीने ठाण्याच्या भाईंना मैदानात उतरवले; काँग्रेसची उपरोधिक टीका

अजित पवारांच्या दादागिरीने ठाण्याच्या भाईंना मैदानात उतरवले; काँग्रेसची उपरोधिक टीका

Subscribe

मुंबई : शासन कार्यनियमावलीच्या दुसऱ्या अनुसूचित निर्दिष्ट केलेली सर्व प्रकरणे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामार्फत मुख्यमंत्री महोदयांना सादर करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहेत. यानुसार अजित पवार यांच्याकडून फाईल थेट मुख्यमंत्र्यांकडे न जाता फडणवीस यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे अजित पवारांचे पंख छाटण्याचा प्रकार केल्याचा दावा राजकीय वर्तुळातून होत आहे. याचपार्श्वभूमीवर बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक आज (31 ऑगस्ट) ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Ajit Pawars bullying brought Thane brothers into the fray Ironic criticism of Congress)

हेही वाचा – ‘इंडिया’ नावाला टींब लावून विरोधकांच्या आघाडीने दुष्कृत्य केलं; भाजपाकडून मुंबईतील बैठकीवर हल्लाबोल

- Advertisement -

विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, दादांच्या (अजित पवार) दादागिरीला भाईंचा (एकनाथ शिंदे) लगाम! अजित पवार मंत्रिमंडळात येऊन दोन महिने झाले, पण त्यांच्या दादागिरीने आता ठाण्याच्या भाईंना मैदानात उतरावे लागले आहे. कोणत्याही फाईली, विशेषत: वित्त विभागाने नाकारलेले प्रस्ताव हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. आता मुख्यमंत्र्यांना नक्कीच कळलं असेल एखाद्याला जेवायला आपले ताट द्यावे, पण बसायला पाट देऊ नये, अशी उपरोधिक टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : इंडिया आघाडीची ताकद बघून चीनही मागे हटेल; संजय राऊतांना विश्वास

- Advertisement -

अजित पवार सरकारमध्ये आल्यानंतर भाजपा आणि शिंदे गटात अस्वस्थता

दरम्यान, अजित पवार यांनी 2 जुलै रोजी काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून भाजपा आणि शिंदे गटामध्ये अस्वस्थता आहे. काही नेत्यांनी नाराजी बोलून दाखवलीहोती. याशिवाय अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांत बैठका आणि निर्णयांचा धडाका लावल्यामुळे पुन्हा एकदा भाजपा आणि शिंदे गटातीन नेत्यांची नाराजी ओढवली घेतली आहे. त्यामुळेच अजित पवार यांच्या कारभाराला लगाम लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. तसेच महत्त्वाच्या फाईलीसह वित्त विभागाने नाकारलेल्या फाईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत आपल्याकडे पाठवाव्यात, असे आदेशही एकनाथ शिंदे यांनी प्रशासनास दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -