घरमुंबईअंधेरी-मानखुर्द जोड रस्त्याचे काम सुमारे १३७ कोटींनी वाढले!

अंधेरी-मानखुर्द जोड रस्त्याचे काम सुमारे १३७ कोटींनी वाढले!

Subscribe

घाटकोपर-मानखुर्द जोड रस्त्याच्या कामासाठी तीन वर्षांपूर्वी सुरुवात झाली. परंतु या कामांमध्ये तब्बल दोनदा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कंत्राट किंमतीत ८० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ५७६.६० कोटी रुपयांचे हे कंत्राट काम चक्क १३७ कोटी रुपयांनी वाढून ७१३.४९ टक्क्यांच्या घरात जाऊन पोहोचले आहे. मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द जोड रस्त्यांच्या कामासाठी महापालिकेने डिसेंबर २०१६ रोजी कंत्राटदाराची निवड करत जे. एम. सी. प्रोजेक्ट इंडिया कंपनीला विविध करांसह ५७६.६० कोटी रुपयांच्या कंत्राट कामांना मंजुरी दिली होती. हे काम पावसाळा धरून ३० महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु, एका वर्षाने या जोड रस्त्यांवर शिवाजीनगर जंक्शन, बैंगनवाडी जंक्शन, देवनार डम्पिंग जंक्शनपर्यंतच्या विस्तारीत बांधकामांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे या कंत्राट कंपनीला ६५.७२ कोटी रुपयांचे वाढीव काम देण्यात आले.

वाढीव कामांसह विविध करांसह ६३२.७८ कोटी रुपयांचे हे कंत्राट काम दिल्यानंतर आता पुन्हा त्यात बदल करत आणखी काही कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार मुख्य उड्डाणपुलाच्या अबुटमेंट ए-२ पासून ते मोहिते पाटील नगर येथील भुयारी वाहतूक मार्गापर्यंत उड्डाणपुलावरील वाढीव कामांचा समावेश त्यात करण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा या कामाचा खर्च वाढला आहे. हा खर्च ८०.७१ कोटींनी वाढल्याने, एकूण कंत्राट कामांचा खर्च ७१३. ४९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

- Advertisement -

आतापर्यंत उड्डाणपुलांच्या एकूण मूळ कामाच्या ७४ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर पहिल्या फेरफारासह समाविष्ट केलेल्या तीन स्टील कांपोझिट कमानींपैकी एका कमानीचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहेत. एकूण ३ पादचारी पुलांपैकी २ पादचारी पुलांचे काम प्रगतीपथावर असून एकूण ८० टक्के काम पूर्ण झालेले आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडकडे जाणार्‍या उड्डाणपुलाचे काम एकूण कामाच्या ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील एकूण खर्च
कंत्राटदार : जे. एम. सी. प्रोजेक्ट इंडिया
मूळ कंत्राट किंमत : ५७६.६० कोटी रुपये
प्रथम वाढीसह एकूण कंत्राट किंमत : ६३२.७८ कोटी रुपये
दुसर्‍या वाढीसह एकूण कंत्राट किंमत : ७१३.४९ कोटी रुपये

- Advertisement -

सल्लागारांवर होणारा खर्च
वाढीव खर्चासह : ६ कोटी १२ लाख ५९ हजार २२७

फेरतपासणी सल्लागारावर होणारा खर्च
वाढीव खर्चासह : ४ कोटी ४७ लाख १३ हजार ८१५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -